नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी: बिग बॅश लीगच्या (2020-21) अंतिम सामन्यात (Final match) सिडनी सिक्सर्सने (sydney sixers) पर्थ स्कोर्चर्सला (perth scorchers) 27 धावांनी पराभूत करत बिग बॅश लीगच्या (Big Bash League 2020-21) जेते पदावर आपलं नाव कोरलं आहे. सिडनी सिक्सर्स संघाने तिसऱ्यांदा बीबीएलचा किताब आपल्या नावे केला आहे. सिडनी सिक्सर्सकडून जेम्स विंसने धमाकेदार कामगिरी करत 60 चेंडूंत 95 धावांची विजयी खेळी साकारली आहे. यामुळे सिडनी सिक्सर्स संघ 20 षटकांत 6 विकेटसह 188 धावांच लक्ष्य ठेवू शकला. धावांचा पाठलाग करताना पर्थचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 161 धावाच करू शकला.
जेम्स विंसच्या धमाकेदार फटकेबाजीने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं. पण या सामन्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे प्रेक्षकांच हसून हसून पोट दुखलं. सिडनीची टीम जेव्हा मैदानात फलंदाजी करत होती, तेव्हा क्रिझवर जेम्स विंस आणि जोश फिलिप फलंदाजी करत होते. तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर जेम्स विंसने अॅन्ड्रू टायच्या गोलंदाजीवर लेग साइटला शॉट खेळला. त्यावेळी बॅटवर बॉल चांगल्याप्रकारे बसला नाही, त्यामुळे बॉल क्रिझवरच पडला. त्यानंतर क्रिझच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या जोश फिलीपने एक धाव चोरण्यासाठी जोरात धावला. त्यावेळी कन्फुज झालेल्या जेम्सने धाव घेण्यालाठी होकार दिला, पण दुसऱ्याच क्षणात त्याच्या लक्षात आलं की बॉल क्रिझवरच आहे, त्यामुळे त्याने धाव घेण्याचा निर्णय बदलला.
Oh my goodness 😨 Chaos in the middle, Josh Philippe is run-out by half a pitch... #BBL10 | #BBLFinals pic.twitter.com/x4i5BMdb2w
— KFC Big Bash League (@BBL) February 6, 2021
पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता. कारण दुसऱ्या बाजूला उभा असलेला फलंदाज फिलिपने अर्ध्यापेक्षा जास्त क्रिझ पार केली होती. अशात विकेट किपरने दुसऱ्या एंडला बॉट थ्रो मारला पण पहिल्या थ्रो मध्ये फिलिपला जीवनदान मिळालं. पण नॉन स्ट्राइक स्टम्पच्या मागे कोलिन मुनरो होते. त्याने बॉल पकडून स्टम्प थ्रो मारला आणि फिलिफला धावचित केलं. यावेळी दोन्ही फलंदाज एकाच बाजूला उभे असल्याचा नाजारा दर्शकांना पाहायला मिळाला. फिलिप केवळ 9 धावा करून आऊट झाला.
हे ही वाचा-पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी उतराखंडच्या दुर्घटनेबद्दल घेतला आढावा
पण यानंतर जेम्स विंसने हार न मानता ताबोडतोब फटकेबाजी करत 60 चेंडून 95 धावा कुटल्या. यावेळी त्याने 10 चौकार आणि 3 षटकारही ठोकले. बीग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात त्याचा स्ट्राइक रेट 158.33 एवढा होता. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे सिडनी सिक्सर्स 188 धावांच लक्ष्य ठेवू शकला. परिणामी सिडनी सिक्सर्सने बीग बॅश लीगच्या दहाव्या मोसमाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. जेम्स विंसच्या अप्रतिम खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news