मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Basketball Player Suicide: भावाच्या मृत्यूचा धक्का... 'या' भारतीय बास्केटबॉलपटूची धरणात उडी घेत आत्महत्या

Basketball Player Suicide: भावाच्या मृत्यूचा धक्का... 'या' भारतीय बास्केटबॉलपटूची धरणात उडी घेत आत्महत्या

युवा बास्केटबॉल खेळाडूची आत्महत्या

युवा बास्केटबॉल खेळाडूची आत्महत्या

Basketball Player Suicide: मध्य प्रदेशच्या बैतूलमधील कालापाठा भागात राहणाऱ्या प्रार्थनानं बास्केटबॉल खेळात मोठी मजल मारली होती. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

बैतूल, 25 नोव्हेंबर: मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 17 वर्षांच्या एका युवा बास्केटबॉलपटूच्या भावाचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. पण याचा धक्का सहन न झाल्यानं प्रार्थना साळवे या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या बास्केटबॉल खेळाडूनं आपलं जीवन संपवलं. गावातल्याच एका धरणात उडी मारुन तिनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. आत्महत्येआधी तिनं आपल्या नातेवाईकांना एक वॉईस मेसेज केला होता. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

कोण होती प्रार्थना साळवे?

शिक्षणासोबतच प्रार्थनाला खेळाचीही आवड होती. मध्य प्रदेशच्या बैतूलमधील कालापाठा भागात राहणाऱ्या प्रार्थनानं बास्केटबॉल खेळात मोठी मजल मारली होती. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. एशियन यूथ चॅम्पियनशीपमध्येही तिचा भारतीय संघात समावेश होता. पण तिच्या अचानक जाण्यानं भारतीय बास्केटबॉलचचं मोठं नुकसान झालं आहे.

का केली आत्महत्या?

प्राथमिक अंदाजानुसार भावाच्या मृत्यूचा तिला मोठा धक्का बसला होता. सात महिन्यांपूर्वीच इंदूरच्या स्वर्ण बाग कॉलनीत लागलेल्या आगीत प्रार्थनाच्या भावाचा मृत्यू झाला होता. हे तेच प्रकरण आहे ज्या प्रकरणात एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरु तरुणानं आग लावली होती. पण या आगीत देवेंद्र साळवे या तरुणाचा हकनाक बळी गेला. याच घटनेचा प्रार्थनानं धसका घेतला होता. त्याचवेळी ज्युनियर नॅशनल बास्केटबॉल टीममध्ये तिचं सिलेक्शन झालं होतं.

हेही वाचा- FIFA WC 2022: रोनाल्डोच्या आयुष्याचे 5 नियम... म्हणून दारु, सिगरेट आणि टॅटूपासून दूर आहे हा स्टार फुटबॉलर!

धरणात उडी मारुन केली आत्महत्या

दरम्यान गुरुवारी प्रार्थनाचा मृतदेह शेजारच्याच एका धरणातून ताब्यात घेण्यात आला. त्याआधी तिनं आपल्या नातेवाईकांना एक वॉईस मेसेजही केला होता. या घटनेनंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. आत्महत्येमागे तिनं भावाच्या मृत्यूचं कारण दिलं आहे. भावाच्या मृत्यूमुळेच ती नेहमी चिंतेत असायची. दरम्यान पोस्टमॉर्टेमनंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला.

First published:

Tags: Sports, Suicide