कोबी ब्रायंटच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचं कारण समोर, धोका असतानाही केलं होतं उड्डाण

कोबी ब्रायंटच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचं कारण समोर, धोका असतानाही केलं होतं उड्डाण

मुलीच्या सामन्यासाठी कोबी ब्रायंट त्याच्या खाजगी हेलिकॉप्टरने कॅलिफोर्नियाहून लॉस एंजिलिसला निघाला होता. त्यावेळी झालेल्या दुर्घटनेत कोबी ब्रायंटसह 9 जणांचा मृत्यू झाला होता.

  • Share this:

कैलाबासास, 28 जानेवारी : हेलिकॉप्टर अपघातात दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटला प्राण गमावावे लागले. या अपघातामध्ये त्याची 13 वर्षीय मुलीसह 9 लोकांचा मृत्यू झाला. मुलीच्या सामन्यासाठी कोबी ब्रायंट त्याच्या खाजगी हेलिकॉप्टरने कॅलिफोर्नियाहून लॉस एंजिलिसला निघाला होता. त्यावेळी ही दुर्घटना झाली होती. यामुळे क्रिडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोबी ब्रायंट ज्या हेलिकॉप्टरने जात होता त्याचा अपघात झाल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात होते. त्याला कारणही तसेच होते. हे हेलिकॉप्टर सुरक्षेसाठी ओळखले जात होते. मात्र त्याच्या अपघातानंतर कारण समोर आलं आहे.पायलटने विमान वाहतुक नियंत्रकांना त्याच्या शेवटच्या मेसेजमध्ये सांगितलं होतं की, तो ढगांच्या एका मोठ्या भागापासून वाचण्यासाठी विमान उंचावरून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतर थोड्याच वेळात विमान खाली कोसळू लागले आणि ते एका पर्वताला धडकले.

राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्डाचे जेनिफर होमेंडी यांनी सांगितलं की, रडारवरून माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टर कोसळण्याआधी 2 हजार 300 फूट उंचीवर गेलं होतं. त्याचे अवशेष 1 हजार 85 मीटर अंतरावर मिळाले होते. एनटीएसबी तपास करत असून घटनास्थळावर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. हेलिकॉप्टरचे तुकडे दूरवर पसरले आहेत. तर काही भाग पर्वताच्या दुसऱ्या बाजूला आहे.

धक्कादायक! 8 वर्षांआधीच ट्विटरवर झाली होती कोबी ब्रायंटच्या मृत्यूची भविष्यवाणी

काही तज्ज्ञांनी म्हटलं की, हवामानामुळे पायलट वाट चुकला असावा. मात्रा होमेंडी यांनी म्हटलं की, तपास यंत्रणा पायलटच्या पार्श्वभूमीसह इंजिनपर्यंत प्रत्येक गोष्टीची बारीक चौकशी करत आहेत. हवामान हा एक लहानसा भाग आहे. ढगाळ वातावरणात हेलिकॉप्टर उडवण्याची विशेष परवानगी पायलटने मागितली होती. ती देण्यात आली होती.

कोबी ब्रायंटने 20 वर्षांच्या करिअरमध्ये केली रेकॉर्डब्रेक कमाई

होमेंडी म्हणाले की, पायलटने विमानाच्या वाहतुक नियंत्रण कक्षाकडे विमानाचा माग काढणाऱ्या रडारकडून मदत मागितली. मात्र त्याला सांगण्यात आलं की, त्याचे विमान खूपच लहान आहे. त्यानंतर चार मिनिटांनी विमान थोडं जास्त उंचीवरून उडवत असल्याचं पायलटनं सांगितलं. तेव्हा त्याच्या योजनेबद्दल विचारलं असता कोणतंही उत्तर आलं नाही अशं होमेंडी म्हणाले.

हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये प्राण गमावणाऱ्या कोबीचं बास्केटबॉलला प्रेमपत्र, पाहा VIDEO

First published: January 28, 2020, 8:16 PM IST
Tags: basketball

ताज्या बातम्या