भारताचे माजी अष्टपैलू बापू नाडकर्णी यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन

भारताचे माजी अष्टपैलू बापू नाडकर्णी यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन

21 ओव्हरमध्ये एकही धाव न देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आजही बापू नाडकर्णी यांच्या नावावर आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जानेवारी : भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. बापू नाडकर्णी 86 वर्षांचे होते. मुख्य म्हणजे भारताचे सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नावावर आजतागायत 21 ओव्हरमध्ये एकही धाव न देण्याचा  वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

डावखुरा गोलंदाज असलेले बापू नाडकर्णी यांनी इंग्लंडच्या संघाविरूद्ध एकही धावा न करता सलग 21 षटकांत गोलंदाजी केली होती. हा आजवरचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने हा विक्रम मोडला नाही. बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी आपल्या कुटुंबासमवेत मुंबईत राहत होते. बापू यांचा जन्म 4 एप्रिल 1933 रोजी झाला होता. 13 वर्ष ते भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले.

बापू नाडकर्णी यांनी 16 डिसेंबर 1955 रोजी न्यूझीलंडविरुद्ध दिल्ली येथे कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी 1968 पर्यंत भारतासाठी 41 कसोटी सामने खेळले. त्यात त्यांच्या नावावर 88 विकेट आहेत. तर, फलंदाज म्हणून बापू नाडकर्णी यांनी 1414 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.

आजही हा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेला नाही

12  जानेवारी 1964 रोजी बापू नाडकर्णी यांनी इंग्लंडविरुद्ध एकही धावा न करता सलग 131 चेंडू टाकले होते. हा सामना मद्रास (आताचे चेन्नई) येथे खेळला गेला, त्या सामन्यात भारताने पहिल्या डावात 457 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावादरम्यान बापू यांनी एकूण 29 षटके टाकली होती, त्यामध्ये 26 ओव्हर  मेडन होत्या.

First published: January 17, 2020, 9:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading