• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • BAN vs PAK : 20 वर्षांपासून क्रिकेट खेळतोय, पण लहान मुलासारखा आऊट झाला शोएब मलिक, VIDEO

BAN vs PAK : 20 वर्षांपासून क्रिकेट खेळतोय, पण लहान मुलासारखा आऊट झाला शोएब मलिक, VIDEO

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) मागच्या दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. एवढा अनुभव असल्यामुळे मलिकने मैदानात समजुतदारपणा दाखवणं अपेक्षित आहे, पण बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh vs Pakistan) पहिल्या टी-20 सामन्यामध्ये शोएब मलिकने निष्काळजीपणा दाखवला आणि रन आऊट झाला.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) मागच्या दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. एवढा अनुभव असल्यामुळे मलिकने मैदानात समजुतदारपणा दाखवणं अपेक्षित आहे, पण बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh vs Pakistan) पहिल्या टी-20 सामन्यामध्ये शोएब मलिकने निष्काळजीपणा दाखवला आणि रन आऊट झाला. बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजुर रहमानने टाकलेला बॉलवर शोएब मलिकने डिफेन्सिव शॉट खेळला. हा बॉल विकेट कीपर नुरुल हसनजवळ गेला, त्यावेळी शोएब क्रीजबाहेर उभा होता. मॉर्निंग वॉकला गेल्यासारखा शोएब मलिक क्रीजच्या बाहेर फिरत होता, नुरुल हसनने याचा फायदा घेतला आणि बॉल स्टम्पवर मारला. शोएब मलिकने बॅट क्रीजमध्ये टेकवण्याच्या आधीच बेल्स पडल्या होत्या, यानंतर थर्ड अंपायरने मलिकने त्याला आऊट दिलं. 3 बॉलमध्ये एकही रन न करता शोएब मलिक पॅव्हेलियनमध्ये परतला. शोएब मलिकच्या अशापद्धतीने आऊट होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शोएब मलिकचा हा निष्काळजीपणा पाकिस्तानला महागात पडला असता, कारण त्यावेळी बांगलादेशच्या 128 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था 27 रनवर 3 विकेट अशी झाली होती. 100 रनच्या आत पाकिस्तानचे 6 खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण शादाब खानने नाबाद 21 रन आणि मोहम्मद नवाजने नाबाद 18 रनची खेळी केली आणि पाकिस्तानला 4 विकेटने विजय मिळवून दिला. या सामन्यात पाकिस्तानच्या बॉलरनी चांगली कामगिरी केली. हसन अलीने 22 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. बांगलादेशकडून मेहदी हसनने 20 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले. शोएब मलिकने नुकत्याच संपलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली होती. 6 सामन्यांमध्ये 181 च्या स्ट्राईक रेटने त्याने 100 रन केले, यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता.
  Published by:Shreyas
  First published: