मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

थोबाडात मारल्याने 5 वर्षांची बंदी, आईच्या उपचारासाठी वेळेआधीच मैदानात परतला क्रिकेटपटू

थोबाडात मारल्याने 5 वर्षांची बंदी, आईच्या उपचारासाठी वेळेआधीच मैदानात परतला क्रिकेटपटू

क्रिकेटपटू आणि वाद यांच्यात जुनं नातं आहे. या वादांमुळे क्रिकेटपटूंवर अनेकवेळा कारवाई झाल्याचंही आपण पाहिलं आहे. बांगलादेशचा फास्ट बॉलर शहादत हुसेनही (Shahadat Hossain) त्यातलाच एक.

    ढाका, 6 जून : क्रिकेटपटू आणि वाद यांच्यात जुनं नातं आहे. या वादांमुळे क्रिकेटपटूंवर अनेकवेळा कारवाई झाल्याचंही आपण पाहिलं आहे. बांगलादेशचा फास्ट बॉलर शहादत हुसेनही (Shahadat Hossain) त्यातलाच एक. दोन वर्षांपूर्वी एका स्थानिक खेळाडूच्या थोबाडात मारल्यामुळे त्याच्यावर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली, पण तरीही शहादत ढाका प्रीमियर डिव्हिजनची मॅच खेळण्यासाठी उतरला. शहादतच्या आईला कॅन्सर झाला आहे, आईच्या उपचारांसाठी त्याने मैदानात पुनरागमन करण्यासाठी विनंती केली होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मात्र याबाबत अधिकृत काहीही घोषणा केलेली नाही. शहादतने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे बंदी कमी करावी, अशी विनंती केली होती. बोर्डाच्या क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष अक्रम खान यांनीही मागच्या काही दिवसांपासून शहादत अडचणीत असल्याचं सांगितलं होतं. त्याच्या आईला कॅन्सर झाला आहे, तसंच तो क्रिकेटही खेळत नाही. आम्ही अनुशासन समितीला याबाबत सांगितलं आहे. लवकरच आम्हाला सकारात्मक परिणाम दिसेल. तो नॅशनल क्रिकेट लीगमध्ये सहभागी होईल, अशी आशा आहे, असं अकरम खान म्हणाले होते. शहादत हुसैन ने इंटरनेशनल क्रिकेट में 123 विकेट लिए हैं. (ICC Twitter) मार्च महिन्यामध्ये शहादतने याबाबत माफीही मागितली होती. मी चूक केली आणि भविष्यात अशी चूक कधीही होणार नाही, असं तो म्हणाला होता. बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या शहादतला मे 2015 नंतर बांगलादेशच्या टीममध्ये संधी मिळाली नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये शहादतने टीममधल्या एका सहकाऱ्याला एनसीएल मॅचदरम्यान थोबाडात मारली होती. यानंतर त्याच्यावर एक लाख बांगलादेशी टाका आणि पाच वर्षांची बंदी अशी कारवाई करण्यात आली. बांगलादेशकडून शहादत 38 टेस्ट, 51 वनडे आणि 6 टी-20 खेळला आणि एकूण 123 विकेट मिळवल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Bangladesh cricket team, Cricket news

    पुढील बातम्या