गोलंदाजाने असा चेंडू टाकला की उडाली खळबळ, VIRAL VIDEO

गोलंदाजाने असा चेंडू टाकला की उडाली खळबळ, VIRAL VIDEO

बांगलादेश प्रीमिअर लीगला सुरुवात होताच एका गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूमुळे खळबळ उडाली आहे.

  • Share this:

ढाका, 13 डिसेंबर : बांगलादेश प्रीमिअर लीगला सुरुवात होताच एका गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूमुळे खळबळ उडाली आहे. बुधवारी स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज क्रिश्मार संतोकी याने एक असा चेंडू टाकला की तो पाहून हसावं की रडावं असा प्रश्न तर पडलाच पण संशयही निर्माण झाला आहे.

सिल्हट थंडर्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज संतोकीने चेंडू थोडाथोडका नव्हे तर एक मीटर बाहेर टाकला. असा चेंडू कसोटीतही पंचांकडून सहज वाइ़ड म्हणून घोषित केला गेला असता.

क्रिश्मार संतोकीने डावाच्या दुसऱ्या षटकात चटगांव चॅलेंजर्सकडून खेळताना लंकेचा फलंदाज अविष्का फर्नांडोला असा चेंडू टाकला की सगळेच अवाक् झाले. फक्त वाइड चेंडूच नाही तर दोन चेंडूंनंतर एक असा नो बॉल टाकला की त्यात त्याचा पुढचा पाय रेषेपासून एक फूट अंतरावर होता.

चेंडू इतका वाइड आणि नो टाकल्यानंतर त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका युजरने ट्विट करून म्हटलं की, ही टी20 टूर्नामेंट फिक्सिंगसाठीच आहे.

सामना फिक्स असल्याचे म्हणताना स्पॉट फिक्सिंग एवढंच एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकाने लवकरच आयसीसी मैदानावर पोलिस पाठवण्याची शक्यता असंही म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Dec 13, 2019 06:43 PM IST

ताज्या बातम्या