वनडेमध्ये धमाका! 48 षटकार आणि 70 चौकारासह फलंदाजांनी चोपल्या 818 धावा

वनडेमध्ये धमाका! 48 षटकार आणि 70 चौकारासह फलंदाजांनी चोपल्या 818 धावा

एकदिवसीय सामन्यात फलंदाजांनी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना तब्बल 818 धावा काढल्या.

  • Share this:

ढाका, 28 जानेवारी : क्रिकेटमध्ये दररोज नवनवे विक्रम होत असतात. ते पुन्हा कधीतरी मोडले जातात. तरीही काही विक्रम असे असतात ज्यावर विश्वास बसणं कठीण असतं. आता बांगलादेशच्या सेकंड डिव्हिजनच्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या रेकॉर्डने जगाचे लक्ष वेधलं आहे. बांगलादेशच्या घरेलू क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम झाला आहे.

एकदिवसीय सामन्यात फलंदाजांनी एकूण 48 षटकार आणि 70 चौकारांसह 818 धावा केल्या. यामध्ये नॉर्थ बंगाल क्रिकेट अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 432 धावांचा डोंगर रचला. यामध्ये फलंदाजांनी 27 षटकार मारले. अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना टॅलेंट हंटच्या फलंदाजांनीसुद्धा तुफान फटकेबाजी केली. मात्र त्यांना 46 धावांनी पराभव पत्करावा लागला.

टॅलेंट हंटला 7 बाद 386 धावांपर्यंत मजल मारता आली. टॅलेंट हंटच्या फलंदाजांनी एकूण 21 षटकार मारले. सामन्याच्या आय़ोजकांनी सांगितलं की, हा अनोखा सामना होता. इतक्या वर्षांत ढाक्यातील घरेलू क्रिकेटमध्ये असा सामना झाला नव्हता.

बांगलादेशच्या घरेलू क्रिकेटमध्ये नेहमी अजब गोष्टी होत असतात. 2017 मध्ये एका खेळाडूने एका षटकात 92 धावा दिल्या होत्या. जाणीवपूर्वक वाइड आणि नोबॉल टाकले होते. त्यानंतर गोलंदाजावर बंदी घातली होती.

अरे देवा! बुमराहशी बोलण्यासाठी खेळाडूंना द्यावे लागतात 50 लाख?

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने सांगितलं होतं की, घरेलू क्रिकेटमधील अनेक सामने आधीच निश्चित असतात. त्याच्या या वक्तव्याचे समर्थन बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष साबिर हुसैन चौधरी यांनी केलं होतं. शाकिब अल हसनवर मॅच फिक्सिंगची ऑफर आल्याचं लपवल्याबद्दल दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. शाकिबवर ही कारवाई आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली होती.

VIDEO : कॅप्टन कोहलीच्या स्टंटने फॅन्स हैराण, पाहा विराटने नेमकं काय केलं!

First published: January 28, 2020, 5:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading