ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी क्रिकेटरनं विकलं घर,'म्हणाला लढणार तर युवराजसारखा'

युवराज सिंगनं कॅन्सरवर मात करत क्रिकेटमध्ये कमबॅक केले होते. असाह काहीसा प्रसंग आणखी एका क्रिकेटपटूवर आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 01:18 PM IST

ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी क्रिकेटरनं विकलं घर,'म्हणाला लढणार तर युवराजसारखा'

ढाका, 30 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट संघानं 2011मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एक धक्कादायक बातमी क्रिकेट चाहत्यांना मिळाली होती. भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा फलंदाज युवराज सिंगला कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आले. मात्र त्यानंतर युवराजनं आश्चर्यकारकरित्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्यामुळं आजपर्यंत युवराज सर्वांसाठी एक आदर्श ठरला आहे. अशाच एक बांगलादेशच्या खेळाडूनं युवराजचा आदर्श समोर ठेवत ब्रेन ट्युमर होऊनही क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बांगलादेशचा फिरकी गोलंदाज मोशर्रफ हुसैन बेहद हा गेल्या काही महिन्यांपासून ब्रेन ट्युमर सारख्या गंभीर आजारानं त्रस्त आहे. 37 वर्षीय मोशर्रफनं बांगलादेशसाठी 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. दरम्यान याचवर्षी मार्चमध्ये बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये चालु सामन्यात या गोलंदाजाला भुरळ आली. सध्या मोशर्रफ सिंगापूरमध्ये उपचार घेत आहे. मात्र दु:खादायक बातमी म्हणजे या खेळाडूकडे उपचारासाठी पैसेही नाही आहे.

उपचारासाठी घरही ठेवले गहान

बांगलादेशची वेबसाइट बीडी क्रिकटाइमनं दिलेल्या बातमीनुसार, मोशर्रफच्या 3 थेरपी शिल्लक आहेत. मात्र त्याच्याकडे पैसे नसल्यामुळं त्याला आपले राहते घर गहान ठेवावे लागले. मोशर्रफला उपचारासाठी 1.19 कोटींची गरज होती. त्याला कोणतीही मदत मिळत नसल्यामुळं त्याला अखेर आपले घर गहान ठेवावे लागले.

Loading...

मोशर्रफसाठी युवराज आहे आदर्श 

मोशर्रफ हुसेननं या बेवसाइटला दिलेल्या माहितीनुसार, "मी या आजाराचा सामना करत आहे. कारण टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंग माझ्यासाठी आदर्श आहे. सिंगला 2011मध्ये वर्ल्ड कप दरम्यान कॅन्सर झाला होता. तरी त्यानं जोमानं क्रिकेटमध्ये कमबॅक केला. त्याच्याप्रमाणे मलाही क्रिकेटमध्ये कमबॅक करायचे आहे. त्यासाठी मी मेहनत करण्यास तयार आहे". युवराजला कॅन्सर झाला होता, मात्र त्यानं कधी हार मानली नाही. क्रिकेटमध्ये पुनरागमन करत पुन्हा आपले स्वप्न पूर्ण केले, त्यामुळं युवी सर्वांचा आदर्श आहे.

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 01:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...