India vs Bangladesh : क्रिकेटमधील अजब कारवाई, संघ संपावर गेला म्हणून कर्णधाराचं करिअर धोक्यात

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच संघ संपावर गेला म्हणून होणार कर्णधारावर कारवाई.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 01:29 PM IST

India vs Bangladesh : क्रिकेटमधील अजब कारवाई, संघ संपावर गेला म्हणून कर्णधाराचं करिअर धोक्यात

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : क्रिकेटच्या इतिहासात खेळाडूंनी क्रिकेट खेळण्यास नकार दिल्याचे प्रकार आपण ऐकले असतील मात्र पहिल्यांदाच संघ संपावर गेल्याचा प्रकार घडला. एका आंतरराष्ट्रीय संघानं पगार वाढवले नाही म्हणून संप केला होता, मात्र त्यांना क्रिकेट बोर्डापुढे झुकावे लागले. दरम्यान या संपाचा सर्वात मोठा फटका बसणार होता तो भारतीय संघाला आणि टी-20 वर्ल्ड कपला. मात्र आता पुन्हा भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. एकेकाळी कर्णधाराच्या मैदानावरील वर्तणुकीमुळं त्याच्यावर कारवाई केली जात असे, आता मात्र क्रिकेटच्या इतिहासात एक भलताच प्रकार घडला आहे. संघामुळं कर्णधाराचे भवितव्य धोक्यात आले आहे.

संपावर गेलेला हा संघ आहे बांगलादेशचा क्रिकेट संघ. भारत-बांगलादेश यांच्यात नोव्हेंबरमध्ये टी-20 आणि कसोटी मालिका होणार आहे. मात्र, या मालिकाआधी विघ्न काही संपण्याचे नाव घेत नाही आहेत.काही दिवसांपूर्वी बांगलादेश क्रिकेट संघानं मालिकेआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डापुढे आपल्या मांगण्या मांडल्या होत्या. दरम्यान यावेळी खेळाडूंनी पगारवाढीच्या मुद्यावरून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट बोर्डाच्या दबावामुळं खेळाडूंनी हा संप मागेही घेतला. आता मात्र खेळाडूंनी संप पुकारल्यामुळं कर्णधाराला याची शिक्षा मिळणार आहे. बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसनवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

वाचा-भारताच्या क्रिकेटपटूचा संघ स्पॉट फिक्सिंगमध्ये, प्रशिक्षकासह फलंदाजाला अटक

भारताविरोधात 3 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेआधी खेळाडूंनी संप करण्याचा निर्णय घेतला. मात्र बोर्डापुढे खेळाडूंना झुकावे लागले. मात्र आता बांगलादेश क्रिकेट बोर्डानं कर्णधारावर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली आहे. यासाठी शाकिबला नोटीसही पाठवण्यात आली आहे. शाकिबवर नियमांचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर शाकिबनं एका टेलिकॉम कंपनीसोबत केलेल्या कराराबाबतही बोर्डानं जाब विचारला आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी शाकिबला नोटीस बजावण्यात आली असल्याचे सांगत, “शाकिबला काही दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. शाकिबचे उत्तर आले नाही किंवा ते उत्तर आम्हाला संतुष्ट करणारे नसल्यास बोर्ड त्याच्यावर कारवाई करू शकते", असे सष्ट केले. त्यामुळं भारत-बांगलादेश मालिकेतील अडचणी आता वाढल्या आहेत.

Loading...

वाचा-देशाला सुवर्णपदक जिंकून दिलं पण आता शोधतोय नोकरी

अशी आहे टी- मालिका

पहिला टी-20 सामना - 3 नोव्हेंबर (दिल्ली)

दुसरा टी20 सामना- 7 नोव्हेंबर (राजकोट)

तिसरा टी20 सामना- 10 नोव्हेंबर (नागपुर)

वाचा-BCCIच्या लोगोनं केला दिग्गज क्रिकेटपटूचा घात, झाली मोठी कारवाई

असा आहे भारताचा टी-20 संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकुर.

असा आहे बांगलादेशचा संघ- शाकिब-अल-हसन (कर्णधार), तमीम इकबाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मोसादिक हुसैन, अमिनुल इस्लाम, अराफात सनी, मोहम्मद सैफउद्दीन, अल अमीन हुसैन, मुस्तफिजुर रहमान, सफीउल इस्लाम.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2019 01:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...