World Cup : बांगला 'टायगर'ने करून दाखवलं, विंडीजला लोळवलं

बांगलादेशने पुन्हा एकदा 'हम भी किसी से कम नही' असं सांगत बलाढ्य विंडीज संघाला धूळ चारली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 11:18 PM IST

World Cup : बांगला 'टायगर'ने करून दाखवलं, विंडीजला लोळवलं

लंडन, 18 जून : एकीकडे पाकिस्तानला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे बांगलादेशने पुन्हा एकदा 'हम भी किसी से कम नही' असं सांगत बलाढ्य विंडीज संघाला धूळ चारली आहे. विंडीजने दिलेल्या 321 धावांचं आव्हान 41.3 षटकात सहजरित्या पार केलं आहे. शाकीब अल हसनच्या झुंझार शतकी खेळीच्या बळावर बांगलादेशने विजयाची मोहर उमटवली.

बांगलादेशने वेस्ट इंडीजवर तब्बल 7 गडी राखून विजय मिळवला आहे. शाकीब अल हसनने बांगला टीमच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 99 चेंडून 14 चौकार लगावत नाबाद 124 धावांची झुंजार खेळी केली. तर त्याला साथ दिली ती लिट्टन दासने. दासनेही 94 धावांची धडाकेबाज खेळी केली. दोघांमध्ये 189 धावांची भागिदारी झाली. परंतु, त्याआधी सलामीला आलेल्या सौम्य सरकार 29 धावा करून झटपट बाद झाला. तर तमीम इकबाल 48 धावांची खेळी करून माघारी परतला.

त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या विंडीज संघाची सुरुवात चांगली नाही राहिली. परंतु, शे होपने 96 तर इविन लुइसने 70 धावांची खेळी करून टीमचा धावफलक उंचावला. त्यानंतर हेटमायरनेही 50 धावांची खेळी करून धावफलकाच भर घातली. परंतु, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणाऱ्या विंडीजचा डाव गडगडला. निर्धारीत 50 षटकात विंडीजने 321 धावा केल्या. त्याला उत्तर देत बांगलादेशने अवघ्या 41.3 षटकात हे आव्हान सहज पार केलं.


=======================

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 10:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...