Ind vs Ban : भारताविरुद्ध बांगलादेशचा संघ जाहीर, तुरुंगात गेलेल्या खेळाडूला दिली संधी

Ind vs Ban : भारताविरुद्ध बांगलादेशचा संघ जाहीर, तुरुंगात गेलेल्या खेळाडूला दिली संधी

भारत आणि बांगलादेश यांच्यात पुढच्या महिन्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात पुढच्या महिन्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय संघ आणखी एक मालिका मायदेशात खेळणार आहे. 3 नोव्हेंबरपासून या मालिकेला दिल्लीच्या अरूण जेटली मैदानापासून सुरू होणार आहे. दरम्यान याकरिता बांगलादेशच्या वतीनं 15 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

बांगलादेशनं जाहीर केलेल्या संघात फिरकी गोलंदाज अमीन हुसैन आणि अराफत सन्नी यांच्याशिवाय तमीम इक्बालचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान या संघात गोलंदाज रुबेल हुसैन याला संघात जागा देण्यात आलेली नाही. अराफत आणि हुसैन यांनी शेवटचा टी-20 सामना 2016मध्ये खेळला होता. सन्नीनं 10 टी-20 सामन्यांत 12 विकेट घेतल्या आहेत. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप दरम्यान त्याला गोलंदाजीच्या अॅक्शनमुळं निलंबित करण्यात आले होते. एवढेच नाही तर 2017मध्ये त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. या संघाचे कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनकडे असणार आहे.

दरम्यान, भारत सध्या दक्षिण आफ्रिका विरोधात कसोटी सामन खेळत आहे. 19 ऑक्टोबरला तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. मात्र बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुली पदभार स्विकारल्यानंतर करणार आहे. त्यामुळं 20 ऑक्टोबरनंतर बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते.

अशी आहे मालिका

पहिला टी-20 सामना - 3 नोव्हेंबर (दिल्ली)

दुसरा टी20 सामना- 7 नोव्हेंबर (राजकोट)

तिसरा टी20 सामना- 10 नोव्हेंबर (नागपुर)

असा आहे बांगलादेशचा संघ- शाकिब-अल-हसन (कर्णधार), तमीम इकबाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मोसादिक हुसैन, अमिनुल इस्लाम, अराफात सनी, मोहम्मद सैफउद्दीन, अल अमीन हुसैन, मुस्तफिजुर रहमान, सफीउल इस्लाम.

टी-20 क्रिकेटमध्ये बांगलादेशचे प्रदर्शन

बांगलादेशचे टी-20 प्रदर्शन विशेष चांगले राहिलेले नाही. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच याआधी अफगाणिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिक संघानं त्यांना नमवलं होते. त्यामुळं ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं बांगलादेशसाठी हा दौरा महत्त्वाचा असणार आहे.

'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...

First published: October 18, 2019, 1:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading