फिक्सिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगल्यानंतर शाकीब पुन्हा अडकला वादात

बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

  • Share this:
    मुंबई, 6 जून : बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. याआधी मॅच फिक्सिंगप्रकरणी बुकींनी संपर्क केल्यानंतरही शाकीबने आयसीसीच्या (ICC) भ्रष्टाचार विरोधी पथकाला याबाबत माहिती दिली नव्हती, त्यामुळे त्याच्यावर वर्षभराच्या निलंबनाची कारवाई झाली होती. यावेळी शाकीब बायो-बबलचा प्रोटोकॉल तोडल्यामुळे अडचणीत आला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मात्र याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार हे प्रकरण 4 जूनचं आहे. जेव्हा मोहम्मदन स्पोर्टिंग क्लबची त्या दिवशी एकही मॅच नव्हती, पण शाकीब मिरपूरमधल्या एका आयोजन स्थळावर दिसला. यावेळी शाकीब त्याचा सहकारी आसिफ हरन आणि रुयल मिया यांच्यासोबत सराव करत होता. नेटमध्ये सराव करताना तिकडे असलेले बॉलर्स मोहम्मदन किंवा बायो-बबलचा हिस्सा नव्हते. शाकीब सराव करत असताना पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेली एक व्यक्ती त्याच्या संपर्कात आली. तसंच त्याने शाकीबसोबत फोटोही काढले. हा बॉलर शाकीब क्रिकेट अकादमीचा असल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड (Bangladesh Cricket Board) आणि ढाका मेट्रोपोलीस क्रिकेट समितीने एक बैठक बोलावली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल, असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर काजी इमाम यांनी सांगितलं. तसंच जे झालं त्यामुळे आम्ही निराश आहोत. आमच्यासाठी टीम, खेळाडू आणि अधिकाऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे. बायो-बबल तयार करण्यासाठी आम्हाला खूप पैसे भरावे लागले आहेत आणि मेहनतही घ्यावी लागली आहे, असं काजी इमाम म्हणाले.
    Published by:Shreyas
    First published: