मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

शाहरुखच्या हिरोने इतिहास घडवला, क्रिकेट विश्वात हा विक्रम करणारा पहिलाच

शाहरुखच्या हिरोने इतिहास घडवला, क्रिकेट विश्वात हा विक्रम करणारा पहिलाच

कोलकात्याच्या टीममध्ये नवा खेळाडू

कोलकात्याच्या टीममध्ये नवा खेळाडू

बांगलादेशने पाचव्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा (Bangladesh vs Australia) 60 रनने पराभव केला. याचसोबत बांगलादेशने 5 टी-20 मॅचची ही सीरिज 4-1 ने जिंकली. डावखुरा स्पिनर शाकीब अल हसनने (Shakib Al Hasan) या मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या.

  • Published by:  Shreyas

ढाका, 9 ऑगस्ट : बांगलादेशने पाचव्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा (Bangladesh vs Australia) 60 रनने पराभव केला. याचसोबत बांगलादेशने 5 टी-20 मॅचची ही सीरिज 4-1 ने जिंकली. डावखुरा स्पिनर शाकीब अल हसनने (Shakib Al Hasan) या मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या. याचसोबत आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये शाकीबच्या 100 विकेट पूर्ण झाल्या. हा विक्रम करणारा तो जगातला पहिलाच स्पिनर ठरला आहे. टी-20 मध्ये चौथ्यांदा त्याने 4 विकेट घेतल्या आहेत. या सामन्यात टॉस जिंकून बांगलादेशने 122 रन केले होते, पण ऑस्ट्रेलियाचा 62 रनवर ऑल आऊट झाला.

ऑस्ट्रेलियाला फक्त 13.4 ओव्हरच बॅटिंग करता आली. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी ओव्हरमध्ये त्यांचा ऑल आऊट झाला. 15 मार्च 1877 ज्या दिवशी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला, त्यानंतर आजपर्यंत कधीच ऑस्ट्रेलियन टीम एवढ्या कमी ओव्हरमध्ये ऑल आऊट झाली नव्हती.

34 वर्षांच्या शाकीब अल हसनची ही 84 वी टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच होती. 21 च्या सरासरीने त्याने 102 विकेट घेतल्या आहेत. टी-20 मध्ये त्याने 4 वेळा 4 विकेट आणि एकदा 5 विकेट घेतल्या. एवढच नाही तर त्याने 24 च्या सरासरीने 1,718 रनही केले, यामध्ये 9 अर्धशतकं आहेत.

एकूण टी-20 करियरमध्ये शाकीबने 336 मॅचमध्ये 381 विकेट घेतल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट आणि एक हजारपेक्षा जास्त रन करणारा शाकीब एकमेव खेळाडू आहे.

शाकीबने वनडे आणि टेस्टमध्येही चांगली कामगिरी केली आहे. 58 टेस्टमध्ये त्याने 31 च्या सरासरीने 215 विकेट घेतल्या, यात 18 वेळा 5 विकेट आणि 2 वेळा 10 विकेट घेण्याचं रेकॉर्ड आहे. एवढच नाही तर त्याने 39 च्या सरासरीने 3,933 रन केले, यात 5 शतकं आणि 25 अर्धशतकं आहेत. त्याने 215 वनडेमध्ये 29 च्या सरासरीने 277 विकेट घेतल्या, यात 3 वेळा 5 विकेट आणि 9 वेळा 4 विकेट आहेत. 38 च्या सरासरीने त्याने 6,600 रनही केल्या, ज्यामध्ये 9 शतकं आणि 49 अर्धशतकांचा समावेश आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त दोनच बॉलरना 100 विकेट घेता आल्या, यामध्ये श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा (Lasith Malinga) पहिल्या क्रमांकावर आहे. मलिंगाने 84 मॅचमध्ये 107 विकेट घेतल्या, यात 2 वेळा 5 विकेट आणि एकदा 4 विकेट आहेत. 6 रनवर 5 विकेट मलिंगाची सर्वोत्तम कामगिरी आहे. 102 विकेटसह शाकीब दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा टीम साऊदी (Tim Southee) 99 विकेटसह तिसऱ्या आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) 98 विकेटसह चौथ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान (Rashid Khan) 95 विकेट घेत पाचव्या क्रमांकावर आहे. भारताकडून युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) सर्वाधिक 63 विकेट घेतल्या.

First published:

Tags: Australia, Bangladesh cricket team, T20 cricket