ढाका, 22 नोव्हेंबर : पाकिस्तानने तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 मध्ये बांगलादेशचा (Bangladesh vs Pakistan 3rd T20) 5 विकेटने पराभव केला. अखेरच्या बॉलवर मोहम्मद नवाजने (Mohammad Nawaz) फोर मारत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या ओव्हरमध्ये एकूण 3 विकेट गेल्या, पण तरीही बाबर आझमच्या टीमवर प्रश्न उपस्थित होत आहेत. बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लाहने (Mahamadullah) अंतिम ओव्हर टाकली, त्यानेही शेवटच्या ओव्हरमध्ये झालेल्या ड्राम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने टी-20 सीरिजवर 3-0 ने कब्जा केला.
पाकिस्तानला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 8 रनची गरज होती. पहिल्या 5 बॉलमध्ये पाकिस्तानने 6 रन केल्या होत्या आणि 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर त्यांना अखेरच्या बॉलला विजयासाठी 2 रनची गरज होती. महमदुल्लाहने अखेरचा बॉल टाकला, पण मोहम्मद नवाज शेवटच्या क्षणी माघारी फिरला, पण बॉल स्टम्पला लागला. यानंतर बांगलादेशी खेळाडूंनी अपील केली, अंपायरने मात्र डेड बॉल दिला. यानंतर महमदुल्लाहने पुन्हा बॉल टाकला आणि नवाजने फोर मारत पाकिस्तनला विजय मिळवून दिला.
The last ball drama!! Congratulations #Pakistan for the #PakWash and best wishes for #Bangladesh. Although Mahmudullah performed well, BCB has a lot to do for real progress.#BANvPAK #PAKvBAN #BrotherhoodWon pic.twitter.com/kWGEeSjW3W
— Nznn Ahmed (@na_nznn) November 22, 2021
मॅच संपल्यानंतर महमदुल्लाहने या वादावर प्रतिक्रिया दिली. 'नवाज अखेरच्या क्षणी हटला. मी अंपायरला बॉल योग्य आहे का? असा प्रश्न विचारला. आम्ही अंपायरच्या निर्णयाचा सन्मान करतो, त्यांचा निर्णय अंतिम असतो,' असं महमदुल्लाह म्हणाला. हा निर्णय बांगलादेशचे अंपायर तनवीर अहमद यांनी दिला होता. बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लाहने या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. पाकिस्तनविरुद्धच्या पराभवाआधी बांगलादेशने घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा टी-20 सीरिजमध्ये पराभव केला होता.
या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 124 रन केले. मोहम्मद नईमने सर्वाधिक 47 रन केले. पाकिस्तानकडून उस्मान कादीर आणि मोहम्मद वसीम यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तनने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून केला. मोहम्मद रिझवानने 40 आणि हैदर अलीने 45 रन केले. हैदर अलीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, तर रिझवान प्लेयर ऑफ द सीरिज ठरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.