मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

BAN vs NZ : असा बॉल खेळता येणं शक्यच नाही! बॅट्समनही धक्क्यात, VIDEO

BAN vs NZ : असा बॉल खेळता येणं शक्यच नाही! बॅट्समनही धक्क्यात, VIDEO

रचिन रविंद्रने टाकला भन्नाट बॉल

रचिन रविंद्रने टाकला भन्नाट बॉल

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडच्या (Bangaldesh vs New Zealand) टीमचा पहिल्या दोन टी-20 मॅचमध्ये पराभव झाला आहे. पाच टी-20 मॅचच्या या सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा 60 रनवर ऑलआऊट झाला.

  • Published by:  Shreyas

ढाका, 4 सप्टेंबर : बांगलादेशची क्रिकेट टीम गेल्या काही काळापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागच्या 11 टी-20 पैकी 10 मॅच त्यांनी जिंकल्या आहेत. बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडच्या (Bangaldesh vs New Zealand) टीमचाही पहिल्या दोन टी-20 मॅचमध्ये पराभव झाला आहे. पाच टी-20 मॅचच्या या सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा 60 रनवर ऑलआऊट झाला. बांगलादेशच्या स्पिन बॉलिंगसमोर न्यूझीलंडची बॅटिंग गडगडली.

बांगलादेशच्या दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडच्या टीममध्ये प्रमुख खेळाडू नाहीत. पण टॉम लेथम, हेन्री निकोल्स आणि कॉलिन डिग्रॅण्डहोम यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंडचे महत्त्वाचे 8 खेळाडू सध्या आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी युएईला गेले आहेत. 19 सप्टेंबरपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.

प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत न्यूझीलंडने टीममध्ये नवोदितांनाही संधी दिली आहे. 21 वर्षांचा ऑफ स्पिनर रचीन रविंद्र (Rachin Ravindra) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय टीममध्ये दाखल झाला. बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये रविंद्रने टाकलेला एक बॉल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रविंद्रने टाकलेला हा बॉल पाहून बांगलादेशचा महमदुल्लाह यालाही धक्का बसला.

न्यूझीलंडने दिलेल्या 61 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशलाही सुरुवातीला धक्के बसले, पण शाकीब अल हसनने आपल्या अनुभवाचा फायदा घेत 25 रनची खेळी केली.

न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर ग्रॅण्ट एलियट (Grant Elliot) याने रविंद्रने टाकलेल्या बॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. रविंद्रने टाकलेला हा बॉल पडल्यानंतर स्पिनसोबतच बाऊन्सही झाला. महमदुल्लाहने अखेरच्या क्षणी बॅट बाजूला केली, कारण त्याच्या डोक्याच्या बाजूने बॉल गेला.

First published:

Tags: Bangladesh cricket team, New zealand