ढाका, 3 ऑगस्ट : बांगलादेशच्या दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाला (Bangladesh vs Australia) पहिल्याच सामन्यात मोठा धक्का बसला आहे. पहिल्या टी-20 मध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा 23 रनने पराभव केला आहे. बांगलादेशने ठेवलेल्या 131 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा 20 ओव्हरमध्ये 108 रनवर ऑल आऊट झाला. बांगलादेशकडून नसूम अहमदने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मुस्तफिजूर रहमान आणि शोरीफूल इस्लाम यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. मेहेदी हसन आणि शाकीब अल हसनला 1-1 विकेट घेण्यात यश आलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 45 रन केले, तर मिचेल स्टार्कला 14 आणि मॅथ्यू वेडला 13 रनची खेळी करता आली.
Bangladesh win their first-ever T20I against Australia ✨
Nasum Ahmed's sensational performance of 4/19 helps the hosts clinch a 23-run victory in Dhaka 👏 #BANvAUS | https://t.co/PlxU4Zp9fM pic.twitter.com/Wz97VnSuAW — ICC (@ICC) August 3, 2021
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 131/7 एवढा स्कोअर केला. शाकीब अल हसनने सर्वाधिक 36 रन केले, तर ओपनर नईम 30 रन करून, कर्णधार महमदुल्लाह 20 रन आणि अफीफ हुसेन 23 रन करून आऊट झाले. ऑस्ट्रेलियाकडून जॉश हेजलवूडला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. मिचेल स्टार्कने 2 आणि एडम झम्पा, एन्ड्रयू टायला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या विजयासोबतच बांगलादेशने टी-20 सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जात आहे. दुसरी टी-20 बुधवारी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Bangladesh cricket team