मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : भारतीय खेळाडूंवर पुन्हा वर्णद्वेषी टिप्पणी, सिडनीमध्ये खेळ थांबला

IND vs AUS : भारतीय खेळाडूंवर पुन्हा वर्णद्वेषी टिप्पणी, सिडनीमध्ये खेळ थांबला

Image Courtesy @andymcg_cricket

Image Courtesy @andymcg_cricket

India vs Australia Sydney Test: मॅचच्या चौथ्या दिवशीही मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका करण्यात आली. यानतंर सिराज आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी मैदानातल्या दोन्ही अंपायरशी चर्चा केली.

  • Published by:  Manoj Khandekar

सिडनी, 10 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूंना पुन्हा वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सिडनी टेस्टमध्ये खेळ थांबवण्यात आला आहे. याआधी तिसऱ्या दिवशीही प्रेक्षकांमधून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. याची तक्रार भारतीय टीमने क्रिकेट ऑस्ट्रेलिया, अंपायर आणि आयसीसी मॅच रेफ्री यांच्याकडे केली होती.

मॅचच्या चौथ्या दिवशीही मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका करण्यात आली. यानतंर सिराज आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी मैदानातल्या दोन्ही अंपायरशी चर्चा केली. सीमारेषेवर फिल्डिंग करत असताना प्रेक्षकांमधून आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याची तक्रार सिराजने केली आहे.

पाहा Tweet, नेमकं काय घडलंय?

प्रेक्षकांमधल्या कोणत्या समुहाकडून ही टिप्पणी करण्यात आल्याचंही सिराजने सांगितलं, यानंतर पोलिसही यामध्ये पडले. पोलिसांनी या समुहाला स्टेडियम सोडून जायला सांगितलं, यानंतर खेळाला सुरूवात झाली.

दरम्यान शनिवारी बुमराह आणि सिराजवर करण्यात आलेल्या या टिप्पणीवर बीसीसीआयनेही नाराजी जाहीर केली आहे. अशाप्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले आहेत. 'जेन्टलमन्स गेम'मध्ये अशाप्रकारच्या व्यवहाराला थारा नाही. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माहिती घेतली आहे आणि ते संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील, अशी प्रतिक्रिया राजीव शुक्ला यांनी दिली. तर दुसरीकडे आयसीसीही खेळाडूंवर वर्णद्वेषी टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाईच्या तयारीत आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार मैदानात 800 कॅमेरा लावण्यात आले आहेत, तसंच कोरोना व्हायरसमुळे मैदानात मॅच पाहायला आलेल्या सगळ्या 10 हजार प्रेक्षकांची माहिती यंत्रणांना आहे, त्यामुळे टिप्पणी करणाऱ्यांना पकडणं सोपं जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Breaking News, India vs Australia