धक्कादाय्यक ! क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा बॉल टेम्परिंग ?

धक्कादाय्यक ! क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा बॉल टेम्परिंग ?

सोशल मीडियावर त्याचा हा प्रताप व्हायरल झाला आहे आणि नेटिझन्सकडून प्लंकेटवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

  • Share this:

लंडन, 12 मे : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांनी बॉल टेम्परिंग केल्यामुळं क्रिकेटच्या दुनियेत खळबळ माजली होती. दरम्यान त्यांनी बंदीची कारवाई पूर्ण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र आता पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रकार घडल्याची शंका चाहत्यांनी व्यक्त केली आहे. सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात जॉस बटलरनं 55 चेंडूंत 9 षटकार व 6 चौकार खेचून नाबाद 110 धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडन पाकिस्तानसमोर 374 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना, पाकिस्तानकडूनही त्यांना कडवे उत्तर मिळाले, परंतु त्यांना अवघ्या 12 धावांनी हा सामना गमवावा लागला. पण, या सामन्यात 'बॉल टॅम्परिंग' झाल्याता प्रकार उघडकीस आला आहे. घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजावर बंदीची कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत वृत्त आयसीसीनं जारी केलेले नाही.

पाकिस्तानने टॉस कत इंग्लंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. इंग्लंडच्या सलामीवीरांनी यावेळी दमदार सुरुवात केली आणि संघाला शतकी सलामी करून दिली. बटलरच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानला 374 धावांचे आव्हान दिले. दरम्यान पाकिस्तानच्या फलंदाजांनीही चांगली फलंदाजी केली, पण या सामन्यात अजब प्रकार घडला. इंग्लंडचा गोलंदाज लिअॅम प्लंकेट याने चेंडू कुरतडण्याचा प्रताप केला आहे. सोशल मीडियावर त्याचा हा प्रताप व्हायरल झाला आहे आणि नेटिझन्सकडून प्लंकेटवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांनी नुकतीच बंदीची कारवाई पूर्ण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. चेंडू कुरतडण्याचा हा प्रसंग ताजा असताना इंग्लंडचा गोलंदाज लिअॅम प्लंकेट याने चेंडू कुरतडण्याचा प्रताप केला आहे. सोशल मीडियावर त्याचा हा प्रताप व्हायरल झाला आहे आणि नेटिझन्सकडून प्लंकेटवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

वाचा- मुंबईच्या विजेतेपदासाठी धोनीचा 'चॅम्पियन' उतरणार मैदानात?

वाचा- MI vs CSK : ‘या’ खेळाडूचा वाढदिवस मुंबईसाठी ठरणार लकी ?

वाचा- 'शर्माजी का बेटा' फायनलसाठी चेन्नईचा 'लक फॅक्टर' ठरणार?

VIDEO : राजकारणाच्या मैदानातील 'सामना', मतदानानंतर गौतम गंभीर म्हणतो...

First published: May 12, 2019, 6:20 PM IST

ताज्या बातम्या