मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ball Tampering वरून ऑस्ट्रेलियन टीममध्ये फूट, बॅनक्रॉफ्टच्या आरोपांमुळे बॉलर्स भडकले

Ball Tampering वरून ऑस्ट्रेलियन टीममध्ये फूट, बॅनक्रॉफ्टच्या आरोपांमुळे बॉलर्स भडकले

2018 साली झालेल्या बॉल टॅम्परिंग (Ball Tampering) वादाच्या भूताने क्रिकेट ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कॅमरन बॅन्क्रॉफ्टने (Cameron Bancroft) या वादात बॉलर्सची नावं घेतल्यानंतर आता त्यांनीही बॅन्क्रॉफ्टला प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 18 मे : 2018 साली झालेल्या बॉल टॅम्परिंग (Ball Tampering) वादाच्या भूताने क्रिकेट ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कॅमरन बॅन्क्रॉफ्टने (Cameron Bancroft) या वादात बॉलर्सची नावं घेतल्यानंतर आता त्यांनीही बॅन्क्रॉफ्टला प्रत्युत्तर दिलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या 4 बॉलर्सनी बॅन्क्रॉफ्टने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सना आपण बॉलशी छेडछाड करत असल्याचं माहिती होतं, असं बॅनक्रॉफ्ट म्हणाला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या टेस्टमध्ये पॅट कमिन्स (Pat Cummins), जॉश हेजलवूड (Josh Hazellwood), मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि नॅथन लायन (Nathan Lyon) यांचा समावेश होता.

या चार बॉलर्सनी संयुक्त निवेदन देऊन बॉल टॅम्परिंग वादावर पसरवण्यात येणाऱ्या अफवा थांबवाव्यात अशी मागणी केली आहे. 'न्यूलंड्स टेस्टमध्य बॉलशी छेडछाड झाल्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती. आमच्या इमानदारीचा आम्हाला अभिमान आहे. जुने खेळाडू आणि पत्रकारांनी यावर प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे. या विषयावर आम्ही खूपवेळा उत्तरं दिली आहेत. पण पुन्हा एकदा आमची बाजू मांडावी आणि तथ्य समोर आणावं, असं आम्हाला वाटलं. बॉलची स्थिती बदलण्यासाठी एखादी गोष्ट मैदानात आणली गेली, हे आम्हाला माहिती नाही. आम्हीही स्टेडियममध्ये लागलेल्या स्क्रीनवरच याचा फोटो बघितला,' असं ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी सांगितलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या 4 बॉलर्सनी बॅनक्रॉफ्टचं नाव घेतलेलं नसलं, तरी त्याच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. पुरावे नसतानाही काहींना जर आम्ही बॉलर्स असल्यामुळे आम्हाला बॉलशी छेडछाड झाली आहे, हे माहिती असेल, तर ते चुकीचं आहे, असं ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स त्यांच्या निवेदनात म्हणाले आहेत.

'न्यूलंड्सच्या मैदानात त्या दिवशी जे झालं ते चुकीचं होतं आणि ते करायची काहीही गरज नव्हती. या घटनेमुळे आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत. माणूस आणि खेळाडू म्हणून आम्ही स्वत:ला सुधरवण्याची प्रक्रिया सुरू ठेवू,' अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी दिली आहे.

बॅन्क्रॉफ्टने द गार्डियन या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला बॉलर्सना बॉल टॅम्परिंगबाबत माहिती होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल मीच जबाबदार आहे, पण बहुतेक बॉलर्सना याबाबत माहिती होती, असं उत्तर बॅन्क्रॉफ्टने दिलं.

2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केप टाऊन टेस्टमध्ये बॅनक्रॉफ्टने बॉलला सॅण्ड पेपर (Sand Paper) लावून बॉल रगडला. ही दृष्यं कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर क्रिकेट विश्वात मोठा वाद निर्माण झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत कडक पावलं उचलत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांचं एका वर्षासाठी तसंच बॅन्क्रॉफ्टचं 9 महिन्यांसाठी निलंबन केलं होतं.

First published:

Tags: Australia, Cricket