News18 Lokmat

VIDEO : झेल सुटला आणि चेंडू डोक्यावर आदळला, भारतीय गोलंदाज जखमी

स्वत:च्या गोलंदाजीवर झेल घेण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय गोलंदाज झाला जखमी

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 05:08 PM IST

VIDEO : झेल सुटला आणि चेंडू डोक्यावर आदळला, भारतीय गोलंदाज जखमी

कोलकत्ता,11 फेब्रुवारी : भारताकडून खेळलेला बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक डिंडाला सोमवारी सराव सामना खेळत असताना डोक्याला चेंडू लागून दुखापत झाली. इडन गार्डनवर झालेल्या सामन्यावेळी ही घटना घडली. बंगालच्या संघाचा सराव सुरू असताना आपल्याच गोलंदाजीवर झेल घेण्याच्या प्रयत्नात डिंडाच्या डोक्यावर चेंडू आदळला.

याबाबत बंगालच्या संघातील एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, फलंदाज वीरेंद्र सिंगने डिंडाच्या चेंडूवर जोराचा फटका मारला. यावेळी अशोक डिंडाने झेल घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातातून चेंडू निसटून डोक्याला लागला. यामुळे डिंडा मैदानावरच कोसळल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता.

डिंडाला गंभीर दुखापत झाली नसल्याचं क्रिकेट असोशिएशन ऑफ बंगालच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुखापत झाल्यानंतरही त्याने षटक पूर्ण केलं. तपासणीसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डिंडाला गंभीर दुखापत नसली तरी त्याला दोन दिवसांच्या विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.Loading...

गेल्या आठवड्यात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्यावेळी श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेच्या डोक्याला चेंडू लागल्याने तो मैदानावरच कोसळला होता. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं होतं. त्याच्यावरही दोन दिवस उपचार सुरू होते.  यापूर्वी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्युजेसला बाऊन्सर चेंडू डोक्यावर आदळल्याने जीव गमवावा लागला होता. त्यावेळी फिलिप जाग्यावरच बेशुद्ध झाला होता.

बंगालचा संघ आंतरराज्य टी20 स्पर्धेत 21 फेब्रुवारीला मिझोरामविरुद्ध खेळणार आहे. डिंडाने 13 एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केलं आहे. यात त्याने 51 च्या सरासरीने 12 विकेट घेतल्या आहेत. तर 9 टी20 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत.  यात 19 धावांत 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...