VIDEO : बेअरस्टोची ही शतकी आतषबाजी तुम्ही पाहिलीत का?

VIDEO : बेअरस्टोची ही शतकी आतषबाजी तुम्ही पाहिलीत का?

आयपीएलमध्ये सलग ३ वेळा शतकी सलामी देणारी ही बेअरस्टो-वॉर्नर यांची पहिलीच जोडी ठरली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 31 मार्च : आयपीएलच्या बाराव्या हंगमात आतापर्यंत अनेक खेळाडूंची आतषबाजी पाहायला मिळाली. मात्र आज हैदरबाद विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यात जॉनी बेअरस्टोचे एक वेगळेच रुप पाहायला मिळालं. सलामीवीर जॉनी बेअरस्टोवने ५२ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील त्याचे हे दुसरे शतक ठरले. या शतकी खेळीच्या जोरावरच हैदराबादनं बंगळुरूला तब्बल 232 धावांचे आव्हान दिले आहे.पहिल्या चेंडूपासूनच चौकारांची आणि षटकारांची आतषबाजी करत, 16व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेत जॉनी बेअरस्टोनं शतक पूर्ण केलं. आयपीएलमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरलं. त्याने 52 चेंडूंत 102 धावा पूर्ण केल्या. हैदराबादनं 17 ओव्हरमध्येच 200चा पल्ला गाठला. वॉर्नर आणि बेअरस्टो यांच्या जोडीनं 185 धावांची भागीदारी केली. या दोघांनी मिळून बंगळुरूच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. बेअरस्टोची ही फलंदाजी पाहून तुम्हाला गेलची किंवा रसेलची आठवण येईल.दरम्यान आयपीएलमध्ये सलग ३ वेळा शतकी सलामी देणारी ही बेअरस्टो-वॉर्नर यांची पहिलीच जोडी ठरली आहे. मात्र सलामीच्या फलंदाजांनी शतक मारण्याची ही पहिली वेळ नाही. 2016 साली विराट आणि एबी डिव्हिलियर्सनं ही अशी कामगिरी केली होती.VIDEO: ट्राफिकच्या भीतीने संरक्षणमंत्र्यांनी मेट्रोतून केला प्रवास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 06:14 PM IST

ताज्या बातम्या