सायना नेहवाल आणि पी. कश्यप अडकणार विवाहबंधनात

यावर्षी १६ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2018 02:40 PM IST

सायना नेहवाल आणि पी. कश्यप अडकणार विवाहबंधनात

भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप या वर्षाखेरीस विवाहबंधनात अडकणार आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून जगापासून लपून प्रेमात अखंड बुडालेल्या या जोडप्याने अखेर लग्नाचा मुहूर्त ठरवला आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप यावर्षी १६ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत.

कौटंबिक आणि मोजक्याच जवळील व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यात फक्त १०० लोकांचा सहभाग असेल असे म्हटले जात आहे.

लग्नानंतर पाच दिवसांनी २१ डिसेंबर रोजी रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे.

Loading...

क्रिडा विश्वात अनेकदा सायना आणि कश्यप यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा होत राहिल्या. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. पी. कश्यपने अनेकदा ते दोघं फक्त चांगले मित्र असल्याचेच मान्य केले.

पारुपल्ली कश्यप हा देशातील सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटूपैकी एक आहे. त्याने २०१४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रिया ओपनसारख्या अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत.

३२ वर्षीय कश्यप सध्या जागतिक क्रमवारीत ५७ व्या स्थानावर आहे. एकेकाळी कश्यप ६ व्या स्थानावर होता. मात्र दुखापतीमुळे त्याला काही महिने आराम करावा लागला. ज्यामुळे त्याचे रँकिंग घसरले.

सायना आणि कश्यप दोघंही हैदराबादचे राहणारे असून गेल्या १० वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. पी. गोपीचंद यांच्याकडून ट्रेनिंग घेताना २००५ मध्ये दोघांची पहिली भेट झाली.

सायनाच्या नावे २० नावाजलेले टायटल असून ती भारतातील बॅडमिंटनची सुपरस्टार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2018 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...