उपाशीपोटी कोल्हापूरच्या लेकीनं गाजवल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी हवा मदतीचा हात!

पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झाली असून परदेशात जाण्याचा खर्च कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 05:29 PM IST

उपाशीपोटी कोल्हापूरच्या लेकीनं गाजवल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी हवा मदतीचा हात!

कोल्हापूर, 05 ऑगस्ट :अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर तिनं पॅराबॅडमिंटन क्रमवारीत 20 वं स्थान पटकावलं आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन पदक, राष्ट्रीय स्तरावर 21 तर राज्यस्तरीय स्पर्धेत 2 पदकं पटकावली आहेत. असं असतानाही ती आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं पॅरॉलिंपिक स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. कोल्हापूरची आरती जानोबा पाटील ही शारीरिक अपंगत्वावर जिद्दीने मात करून पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली आहे. भारताकडून तिची निवड झाली खरी पण आता तिच्यासमोर यासाठी अर्थिक तरतूद करण्याचं आव्हान आहे. यासाठी आता तीला मदतीची गरज आहे.

कोल्हापूरची असलेल्या आरती जानोबा पाटील हिची 18 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या Total BWF Para Badminton World Championship स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पण आर्थिक अडचणीमुळे स्पर्धेत सहभागी होणं कठीण बनलं आहे. एका हातानं अपंग असलेल्या आरतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत तीन पदकं पटकावली. तर तुर्की आणि अॅरिश इथं झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत पैशांअभावी जाता आलं नव्हतं. तसेच शासकीय मदतही तिला मिळू शकली नाही.

परदेशातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी येणारा प्रवास खर्च, याशिवाय तिथं राहण्याची खाण्या-पिण्याचा खर्च आवाक्याबाहेरचा असतो. यामुळं अनेक स्पर्धांना मुकावं लागतं. सध्या आरती सोलापुरमध्ये प्रशिक्षण घेत आहे. जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचं तिचं स्वप्न आहे. मात्र तिला मदत मिळाली तरच हे शक्य आहे.

आरतीने परिस्थितीतून मार्ग काढत आतापर्यंत यश मिळवलं आहे. परदेशातील प्रवास आणि इतर खर्च परवडत नसल्यानं अनेकदा आपल्या लेकीला उपाशीपोटी खेळावं लागलं असं आरतीच्या आईनं म्हटलं आहे. तिची आई गृहीणी असून वडील गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

कलम 370 विधेयकावर आठवलेंची राज्यसभेत कविता, पाहा हा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: badminton
First Published: Aug 5, 2019 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...