• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Babar Azam ने अशा दिल्या Diwali च्या शुभेच्छा, पाकिस्तानी कॅप्टनवर टीकेची झोड

Babar Azam ने अशा दिल्या Diwali च्या शुभेच्छा, पाकिस्तानी कॅप्टनवर टीकेची झोड

पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार (Pakistan Cricket Team) बाबर आझमने (Babar Azam) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना दिवाळीच्या (Diwali Wish) शुभेच्छा दिल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई, 5 नोव्हेंबर : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार (Pakistan Cricket Team) बाबर आझमने (Babar Azam) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना दिवाळीच्या (Diwali Wish) शुभेच्छा दिल्या आहेत. बाबर आझमच्या या ट्वीटनंतर बाबरला धर्म आणि आयपीएलवरून ट्रोल करण्यात येत आहे. धर्मावरून एखाद्या खेळाडूला ट्रोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवरही यावरून निशाणा साधण्यात आला होता. बाबर आझम सध्या युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) खेळत आहे. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या टीमने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला पोहोचणारी पाकिस्तान पहिलीच टीम ठरली आहे. ग्रुप-2 मध्ये असलेल्या पाकिस्तानने त्यांच्या सगळ्या 4 मॅच जिंकल्या आहेत. पहिल्याच मुकाबल्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेटने पराभव केला. वर्ल्ड कप इतिहासातला पाकिस्तानचा भारताविरुद्धचा हा पहिलाच विजय होता. यानंतर पाकिस्तानने न्यूझीलंडचा 5 विकेटने, अफगाणिस्तानचाही 5 विकेटने आणि नामिबियाचा 45 रनने पराभव केला. ग्रुप स्टेजमधला पाकिस्तानचा अखेरचा सामना स्कॉटलंडविरुद्ध 7 नोव्हेंबरला होणार आहे. दिवाळीनिमित्त बाबर आझमने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केलं. 'जे सेलिब्रेशन करत आहेत, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. मी तुमच्यासाठी प्रकाश, शांती आणि प्रेमाची प्रार्थना करतो,' असं बाबर त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला. यानंतर बाबरवर सोशल मीडियावरून निशाणा साधण्यात आला. अनेकांनी बाबरला त्याच्या धर्मावरून टार्गेट केलं, तर काहींनी आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी बाबर हे करत असल्याची टीकाही काहींनी केली. दुसरीकडे मोहम्मद शमीलाही (Mohammad Shami) दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्यामुळे आणि पूजा केल्यामुळे ट्रोल करण्यात आलं. याआधी टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध पराभव झाल्यानंतर मोहम्मद शमीला धर्मावरून ट्रोल करण्यात आलं, तसंच त्याच्यावर फिक्सिंगचे आरोपही करण्यात आले. मोहम्मद शमीवर होत असलेल्या या टीकेनंतर क्रिकेटपटू, अभिनेते आणि नेतेही त्याच्यासाठी मैदानात उतरले होते.
  Published by:Shreyas
  First published: