मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /आधी लैंगिक शोषणाचे आरोप, आता बाबर आझम करणार बहिणीशीच लग्न

आधी लैंगिक शोषणाचे आरोप, आता बाबर आझम करणार बहिणीशीच लग्न

पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने साखरपुडा केल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे. बाबरने आपल्या चुलत बहिणीसोबतच साखरपुडा केला आहे.

मुंबई, 1 जून : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने साखरपुडा केल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे. बाबरने आपल्या चुलत बहिणीसोबतच साखरपुडा केला आहे, पुढच्या वर्षी दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. 26 वर्षांच्या बाबर आझमला काहीच काळापूर्वी तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनवण्यात आलं होतं.

बाबर आझमला लग्न करण्याचा सल्ला काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानचा वरिष्ठ खेळाडू अजहर अलीने दिला होता. अजहर एका चाहत्याच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना म्हणाला, बाबरला आता लग्न केलं पाहिजे. बाबरने अजहरचा हा सल्ला गांभिर्याने घेतल्याचं म्हणावं लागेल.

काही महिन्यांपूर्वी बाबर आझमवर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. बाबरने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवल्याचा दावाही या महिलेने केला होता. लाहोरच्या न्यायालयाने याप्रकरणी पाकिस्तानच्या केंद्रीय चौकशी यंत्रणेला एफआयआर दाखल करण्याचे आदेशही दिले होते. बाबर आझमने मात्र या महिलेचे आरोप फेटाळून लावले. आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांची मला सवय झाली आहे. ही माझी वैयक्तिक गोष्ट आहे आणि माझे वकील न्यायालयात लढत आहेत, असं बाबर म्हणाला होता.

बाबर आझम सध्या अबूधाबीमध्ये आहे, जिकडे पीएसएल (PSL) होणार आहे. पीएसएलच्या या मोसमात बाबरने धमाकेदार कामगिरी केली होती. कोरोनामुळे पीएसएल स्थगित झाली तेव्हा, बाबरने 5 मॅचमध्ये 86 च्या सरासरीने आणि 3 अर्धशतकं करून 258 रन केले.

First published:
top videos

    Tags: Babar azam, Cricket, Pakistan