मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

बाबर आझमने मोडला विराटचा आणखी एक विश्वविक्रम!

बाबर आझमने मोडला विराटचा आणखी एक विश्वविक्रम!

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) आणखी एक विश्वविक्रम मोडीत काढला आहे.

  • Published by:  Shreyas

हरारे, 25 एप्रिल : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) आणखी एक विश्वविक्रम मोडीत काढला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 2 हजार रन करण्याचा रेकॉर्ड बाबरने केला. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये बाबरने या विश्वविक्रमाला गवसणी घातली. बाबरने 52 व्या इनिंगमध्ये 2 हजार रन पूर्ण केले, तर विराटला हेच रेकॉर्ड करायला 56 इनिंग लागल्या होत्या.

झिम्बाब्वेविरुद्धची तीन टी-20 मॅचची सीरिज सुरू होण्याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 51 सामन्यांच्या 49 इनिंगमध्ये 49 च्या सरासरीने 1,940 रन केले होते. यामध्ये एक शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश होता. सीरिजच्या पहिल्या सामन्यात त्याला फक्त 2 रन करता आल्या होत्या, तर दुसऱ्या मॅचमध्ये त्याने 41 रन केले, त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याला विराटचा विक्रम मोडण्यासाठी 17 रनची गरज होती.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 1 हजार रन करण्याचा विक्रम इंग्लंडच्या डेव्हिड मलानच्या नावावर आहे. मलानने 24 इनिंगमध्ये तर बाबरने 26 आणि विराटने 27 इनिंगमध्ये 1 हजार रन पूर्ण केले. काहीच दिवसांपूर्वी बाबरने वनडे क्रमवारीत विराटला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये विराटला अजून एकही शतक करता आलेलं नाही, तर बाबरच्या नावावर एक शतक आहे, तर एकूण टी-20 करियरमध्ये बाबरने 5 शतकं केली आहेत. या सामन्याआधी बाबरने टी-20 क्रिकेटमध्ये 176 मॅचच्या 170 इनिंगमध्ये 45 च्या सरासरीने 6,252 रन केले, यात 5 शतकं आणि 50 अर्धशतकं आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही 128 चा आहे.

First published:

Tags: Babar azam, T20 cricket, Virat kohli