स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 च्या स्पॉन्सरशिप शर्यतीत आता बाबा रामदेव! पतंजली लावणार बोली

IPL 2020 च्या स्पॉन्सरशिप शर्यतीत आता बाबा रामदेव! पतंजली लावणार बोली

बीसीसीआयने गेल्या आठवड्यात विवोबरोबरचा करार संपविण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये, विवो इंडियाने 2199 कोटी रुपयांमध्ये आयपीएल टायटल प्रायोजकत्व अधिकार संपादन केले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : आयपीएलचा (IPL) तेरावा हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार होता, मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. अखेर आयपीएलचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर म्हणजेच युएइमध्ये होणार आहे. 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या या हंगामाला सुरुवात होणार असली तरी अद्याप BCCIकडे या स्पर्धेसाठी स्पॉन्सर नाही आहेत. बीसीसीआयनं चिनी कंपनी वीवोकडून (Vivo) मुख्य प्रायोजकत्व काढून घेण्यात आले.

मात्र मीडिया रिपोर्टनुसार, बाबा रामदेव (Baba Ramdev) यांची कंपनी पतंजली (Patanjali) आयपीएल मुख्य प्रायोजकसाठी बोली लावू शकतात. इकनॉमिक्स टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, पतंजलीचे प्रवक्ते एसके तिजरवाला यांनी सांगितले की, "आम्हाला पतंजली हा जागतिक ब्रँड बनवायचा आहे आणि म्हणूनच आम्ही आयपीएल प्रायोजकत्वाबद्दल विचार करीत आहोत". दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं वीवोकडून प्राजोकत्व काढून घेतल्याची घोषणा केली होती.

वाचा-युइएमध्ये मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड खराब! 2014मध्ये कोणत्या संघाचा होता दबदबा?

पतंजलीला होणार फायदा

तज्ज्ञांचे मत आहे की पतंजली हा जागतिक ब्रँड नाही. जर त्यांना आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व मिळाले तर त्यांना नक्कीच फायदा होईल. विवोनंतर जिओ (Jio), अॅमेझॉन (Amazon), टाटा ग्रुप (Tata group), ड्रीम 11 (Dream 11) आणि बायजू (Byju) या कंपन्यांही आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वाच्या शर्यतीत आहेत. बीसीसीआय आयपीएल -13 च्या नवीन प्रायोजकांसाठी संपूर्ण पारदर्शकता आणि नवीन प्रक्रियेचे अनुसरण करणार आहे. त्यामुळे प्रायोजकांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया पाळली जाईल.

वाचा-BCCI ने चिनी VIVO शी पार्टनरशिप अखेर तोडली, आगामी IPL आधी करार मोडला

वीवोकडून बीसीसीआयला मिळायचे 440 कोटी

बीसीसीआयने गेल्या आठवड्यात विवोबरोबरचा करार संपविण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये, विवो इंडियाने 2199 कोटी रुपयांमध्ये आयपीएल टायटल प्रायोजकत्व अधिकार संपादन केले होते. करारानुसार कंपनीला प्रत्येक हंगामात बीसीसीआयला सुमारे 440 कोटी रुपये द्यावे लागले.

Published by: Priyanka Gawde
First published: August 10, 2020, 9:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading