• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • अफगाणिस्तान क्रिकेट खेळणार का नाही? तालिबानच्या निर्णयाची सगळ्यात मोठी Update

अफगाणिस्तान क्रिकेट खेळणार का नाही? तालिबानच्या निर्णयाची सगळ्यात मोठी Update

अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये मोठी अपडेट

अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये मोठी अपडेट

अफगाणिस्तानवर कब्जा (Taliban Captures Afghanistan) केल्यानंतर तालिबानची नजर तिथल्या क्रिकेट बोर्डावर (Cricket in Afghanistan) पडली आहे.

 • Share this:
  काबूल, 22 ऑगस्ट : अफगाणिस्तानवर कब्जा (Taliban Captures Afghanistan) केल्यानंतर तालिबानची नजर तिथल्या क्रिकेट बोर्डावर (Cricket in Afghanistan) पडली आहे. रविवारी तालिबानचे प्रतिनिधी, अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे सदस्य आणि बोर्डच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. यानंतर अजीजुल्लाह फाजली (Azizullah Fazli) यांना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचं (Afghanistan Cricket Board) कार्यवाहक अध्यक्ष करण्यात आलं आहे. अजीजुल्लाह आधीही बोर्डाचे अध्यक्ष होते. अजीजुल्लाह आता भविष्यातील स्पर्धा आणि सीरिजबाबत लवकरच निर्णय घेतील. आम्ही क्रिकेटला पाठिंबा देऊ, असं आश्वासन तालिबानने या बैठकीत पुन्हा दिलं. जेव्हा आम्ही मागच्यावेळी देशाची सत्ता मिळवली होती, तेव्हा देशात क्रिकेट खेळायला सुरुवात झाली होती, त्यामुळे यावेळीही क्रिकेटला समर्थन दिलं जाईल, असं तालिबानने सांगितलं. तालिबानचं राजकीय कार्यालय आणि क्रिकेट खेळाडूंसोबत चर्चा करणारे सदस्य अनस हक्कानी यांनी या बैठकीत या आश्वासनाची पुनरावृत्ती केली. अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (Hashmatullah Shahidi), माजी निवड समिती अध्यक्ष असादुल्ला आणि नूर अली झादरान (Noor Ali Zadran) यांनी या बैठकीत सहभाग नोंदवला. बैठकीदरम्यान खेळाडूंनी अनस हक्कानी आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे आभार मानले आणि तालिबानकडून पाठिंब्याची मागणी केली. याआधी तालिबानच्या राजकीय टीमचे सोहेल शाहीन यांनीही क्रिकेट खेळाडूंची भेट घेतली होती. तालिबान कायमच त्यांच्यासोबत उभं राहिल, मी अफगाणिस्तान-पाकिस्तान मॅचची आतुरतेने वाट पाहत आहे, असं सोहेल शाहीन म्हणाले होते. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेत 1 ते 5 सप्टेंबरदरम्यान 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: