मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus: अक्षर 'बापू' तुस्सी ग्रेट हो... कांगारुंविरुद्ध पुन्हा चालली अक्षर पटेलची जादू

Ind vs Aus: अक्षर 'बापू' तुस्सी ग्रेट हो... कांगारुंविरुद्ध पुन्हा चालली अक्षर पटेलची जादू

अक्षर पटेल

अक्षर पटेल

Ind vs Aus: अक्षर पटेलनं तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन बॅट्समनना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं. एकीकडे ऑस्ट्रेलियासमोर इतर बॉलर्स निष्प्रभ ठरले पण अक्षरची फिरकी मात्र प्रभावी ठरली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

हैदराबाद, 25 सप्टेंबर: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातल्या टी20 मालिकेत भारताच्या बॉलिंग डिपार्टमेंटवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. ऑस्ट्रेलियन बॅट्समननी भारताच्या या आक्रमणाचा चांगलाच समाचार घेतला. पण टीम इंडियाचा एक बॉलर मात्र त्याला अपवाद ठरला. त्यानं एकट्यानं तीनही मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन बॅटिंगला वेसण घातली. तो बॉलर आहे लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेल. अक्षर पटेलनं तीन टी20 सामन्यांच्या  या मालिकेत ऑस्ट्रेलियन बॅट्समनना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं.

'अक्षर बापू'ची जादूई फिरकी

अक्षर पटेल संघात बापू या टोपणनावानंही ओळखला जातो. मोहालीच्या पहिल्या टी20त एकीकडे इतर बॉलर्सची धुलाई होत असताना दुसरीकडे अक्षर मात्र किफायतशीर ठरला. त्यानं आपल्या चार ओव्हरच्या स्पेलमध्ये अवघे 17 रन्स देताना 3 विकेट्स घेतल्या. नंतर नागपुरातही 8-8 ओव्हरच्या मॅचमध्येही अक्षर पटेलच्या फिरकीनं ऑस्ट्रेलियन बॅट्समनची दांडी गुल केली. त्यानं दोन ओव्हरमध्ये 13 रन्स देताना मॅक्सवेल आणि डेव्हिड या दोन महत्वाच्या बॅट्समनना माघारी धाडलं.

हैदराबादमध्येही अक्षरचा जलवा

मोहाली आणि नागपूरनंतर अक्षर पटेलनं हैदराबादचं मैदानही गाजवलं. कॅमेरुन ग्रीनच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियानं पहिल्या पॉवर प्लेमध्येच 2 बाद 66 रन्स फटकावले होते. पण त्यानंतर अक्षर पटेलनं टीम इंडियाला सामन्यात परत आणलं. त्यानं याही सामन्यात 4 ओव्हरमध्ये 33 रन्स देताना 3 विकेट्स घेतल्या. त्यात फिंच, जोश इंग्लिस आणि सर्वात धोकादायक मॅथ्यू वेडचा समावेश होता. अक्षर पटेलनं या मालिकेत  3 मॅचमध्ये सर्वाधिक आठ विकेट्स आपल्या नावावर केल्या.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports