मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अक्षर पटेलने दिल्लीच्या विजयामागचे सांगितले रहस्य, म्हणाला कोच पॉटिंगने....

अक्षर पटेलने दिल्लीच्या विजयामागचे सांगितले रहस्य, म्हणाला कोच पॉटिंगने....

Delhi Capitals

Delhi Capitals

पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरूद्धच्या मॅचपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीममध्ये काळजीचं वातावरण होतं. दिल्लीच्या सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं मॅचपूर्वी उघड झालं. त्यामुळे ही मॅच होणार की नाही? यावर प्रश्न निर्माण झालं होतं. या विपरित परिस्थितीमध्येही दोन्ही टीम मॅच खेळण्यावर ठाम होते. कोरोनाच्या भीतीमध्येही संघात काळजीचे वातावरण असतानाही दिल्लीने पंजाबवर विजय मिळवला. या विजयामागचे रहस्य अक्षर पटेलने सांगितले आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 21 एप्रिल: पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरूद्धच्या मॅचपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीममध्ये काळजीचं वातावरण होतं. दिल्लीच्या सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं मॅचपूर्वी उघड झालं. त्यामुळे ही मॅच होणार की नाही? यावर प्रश्न निर्माण झालं होतं. या विपरित परिस्थितीमध्येही दोन्ही टीम मॅच खेळण्यावर ठाम होते. कोरोनाच्या भीतीमध्येही संघात काळजीचे वातावरण असतानाही दिल्लीने पंजाबवर विजय मिळवला. या विजयामागचे रहस्य अक्षर पटेलने (axar patel ) सांगितले आहे. म्हणाला की मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्याशी झालेल्या संवादमुळे टीमचे मनोबल वाढले. त्यामुळे आम्ही सामना जिंकू शकलो. कोरोना संकटाशी झुंज देत असतानाही दिल्लीने आयपीएल सामन्यात पंजाबचा नऊ गडी राखून पराभव केला. हा सामना पुण्याऐवजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज टिम सेफर्ट हा सामन्याच्या काही तासांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. अक्षर म्हणाला, “आम्ही आयसोलेशनमध्ये होतो आणि दोन-तीन दिवसांनी सराव सुरू केला. पाँटिंगने सांगितले की, आमच्याकडे दोन पर्याय आहेत. आम्हाला सामना खेळायचा आहे. एकतर सकारात्मक प्रकरणांचा विचार करून तयारी विसरून जा किंवा बाह्य गोष्टी आपल्या हातात नसल्याचा विचार करून तयारीवर लक्ष केंद्रित करा. IPL 2022 : कोरोनाच्या भीतीमध्येही पंजाबचा पराभव कसा केला? ऋषभ पंतनं केला खुलासा
  त्यांनी दिलेला आम्ही कानमंत्र ऐकला आणि आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रित केले अन् त्यानुसार रणनीती आखली. असे मत अक्षरने यावेळी व्यक्त केले. पंजाबला 115 धावांत गुंडाळल्यानंतर दिल्लीने 10.3 षटकांत लक्ष्य गाठले. डेव्हिड वॉर्नरने नाबाद 60 धावा केल्या. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या फॉर्ममध्ये परतल्याबद्दल आनंद व्यक्त करताना अक्षर म्हणाला की, दिल्ली संघ व्यवस्थापनाने त्याला खूप प्रोत्साहन दिले आहे. तो म्हणाला, “वातावरण खूप महत्त्वाचे आहे. कुलदीपला आत्मविश्वास हवा होता. एक किंवा दोन सत्रे गमावली की आत्मविश्वास कमी होतो. ऋषभ पंत आणि कोचिंग स्टाफने त्याला आवश्यक असलेला आत्मविश्वास दिला. त्यामुळे आम्ही हा सामना जिंकू शकलो अशी भावना अक्षरने यावेळी व्यक्त केली. पंजाबविरुद्ध झालेल्या या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले आणि विरोधी संघाला अवख्या 115धावांवर गुंडाळले. त्यानंतर प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स जेव्हा मैदानात आला, तेव्हा त्यांनी 1 विकेट्सच्या नुकसानावर आणि 10.3 षटकातच विजय मिळवला. दिल्लीचा सलामीवीर डेविड वॉर्नरने अवघ्या 30 चेंडूत 60 धावा ठोकल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Delhi capitals, Ipl 2022, Punjab kings

  पुढील बातम्या