मुंबई, 16 मार्च : इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ऋषभ पंत अपघातानंतर आणखी काही महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने पंतच्या जागी डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपद सोपवलं. वॉर्नरने आयपीएलमध्ये याआधीही संघाचे नेतृत्व केले आहे. आता त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स विजेतेपद पटकावणार का हे पहावं लागेल.
वॉर्नरच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये सनरायजर्स हैदराबादने आरसीबीला हरवून विजेतेपद पटकावलं होतं. मात्र, सनरायजर्स हैदराबादने त्याला रिलीज केलं. आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये वॉर्नर पाचवा क्रिकेटर आहे. कर्णधारपद वॉर्नरकडे तर उपकर्णधारपद भारताचा अष्टपैलू क्रिकेटर अक्षर पटेलकडे असणार आहे. गेल्या वर्षभरात अक्षर पटेलने जबरदस्त अशी कामगिरी केलीय. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत यंदा भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात तो दुसरा आहे.
विराट किंवा धोनी नाही तर हा खेळाडू आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर
दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार ऋषभ पंतचा डिसेंबर महिन्यात अपघात झाला. यानंतर तो आणखी काही महिने मैदानात उतरू शकणार नाही. त्यामुळेच दिल्ली कॅपिटल्सला नवा कर्णधार निवडण्यात आला. रिकी पाँटिंगने असाही विश्वास व्यक्त केला की, आगामी आय़पीएलमध्ये वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सकडून चांगली कामगिरी करेल.
आयपीएल २०२३ च्या हंगामाची सुरुवात ३१ मार्च रोजी होणार आहे. पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल. यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेते गुजरात टायटन्स आमने-सामने असणार आहे. तर अंतिम सामना अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर २८ मे रोजी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.