राष्ट्रीय विक्रमासह महाराष्ट्राच्या अविनाशनं पटकावलं जागतिक स्पर्धेचे तिकीट

राष्ट्रीय विक्रमासह महाराष्ट्राच्या अविनाशनं पटकावलं जागतिक स्पर्धेचे तिकीट

पुरुषांच्या 3000 मी. स्टीपलचेस स्पर्धेत अविनाशनं मोडला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम.

  • Share this:

पटियाला , 18 मार्च : पंजाबमधील पटियाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने सुवर्णपदक पटकावले. अविनाशनं पुरुषांच्या 3000 मी. स्टीपलचेस प्रकारात सुवर्ण जिंकत आशियाई आणि जागितक स्पर्धेचे तिकीटही मिळवले. विशेष बाब म्हणजे अविनाशनं ही स्पर्धा 8 मिनिटे 28.94 सेकंदाच्या वेळेत पूर्ण केली आणि स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला. त्यामुळे सोमवारचा दिवस हा खऱ्या अर्थाने अविनाशमय होता. त्याच्यासह 1500 मीटर शर्यतीत जिन्सन जॉन्सन, अजय कुमार सरोज आणि राहुल आपली सर्वोत्तम वेळ नोंदवत आशियाई स्पर्धेचे तिकीट पटकावले.

गेल्या वर्षी झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत अविनाशने 8 मिनिटे 28.94 सेकंदाची वेळ नोंदविली होती. एका वर्षातच अविनाशनं आपलाच विक्रम मोडला.

याआधी 1981मध्ये गोपाळ सैनी या अॅथलेटने 8 मिनिटे 29.80 सेकंदांची वेळ नोंदवली होती. अविनाशनं 37 वर्षांपूर्वीचा हा विक्रम मोडला होता. तर, 1500 मीटर शर्यतीत जिन्सन जॉन्सनने 3 मिनिटे 41.67 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. आता अविनाशचं पुढचं ध्येय असेल ते, ऑलिम्पिकमध्ये आपली जागा तयार करणे. केरळच्या इरफान कोलोथूम या स्पर्धेकाने चालण्याच्या स्पर्धेत टोकियो-2020 ऑलिम्पिकचं तिकीट मिळवले होते . त्यामुळे आता अविनाशवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

===========================================================

CCTV VIDEO: भर दिवसा तरुणीला रॉकेल ओतून पेटवलं, त्याआधी चाकून केले वार

First published: March 18, 2019, 8:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading