मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20WC: टीम इंडियाचा 'तो' बॉलर अचानक परतला मायदेशी,IPLचे गाजवले होते मैदान

T20WC: टीम इंडियाचा 'तो' बॉलर अचानक परतला मायदेशी,IPLचे गाजवले होते मैदान

Team  India

Team India

टीम इंडियाचा आगामी सामना न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ)31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, आयपीएलचे मैदान गाजवणारा दिल्ली कैपिल्सचा बॉलर आवेश खान (Avesh Khan)मायदेशी परतला आहे.

दुबई, 28 ऑक्टोबर: टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेला युएईयेथे 17 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत सुपर 12 फेरीत एकूण 9 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडियाने एकच सामना खेळला आहे. आगामी सामना न्यूझीलंडविरुद्ध 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, आयपीएलचे मैदान गाजवणारा दिल्ली कैपिल्सचा बॉलर आवेश खान (Avesh Khan)मायदेशी परतला आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी त्याला टीम इंडियाचा नेट बॉलर (Net Bowler)म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. पण तो आता मायदेशी परतला आहे. आवेश खानने ही माहिती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत दिली आहे. मात्र. त्याने घरी परतण्याचे कारण अद्याप स्पष्ट केले नाही.

IPLचे गाजवले होते मैदान

आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या आवेश खानने 15 सामन्यांमध्ये 18.75 च्या सरासरीने आणि 7.37 च्या इकॉनॉमी रेटने 24 विकेट घेतल्या. आरसीबीच्या हर्षल पटेल (३२ विकेट) मागे टाकत यदाच्या मोसमात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

पाकिस्तानकडून मोठ्या पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पुनरागमन करू इच्छित आहे. दोन्ही संघांमधील हा बहुप्रतिक्षित सामना 31 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

First published:

Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup, Team india