मोहाली, 20 सप्टेंबर: ऑस्ट्रेलियानं मोहाली टी20त नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला विश्रांती दिली असून दिनेश कार्तिक विकेट किपिंग करणार आहे. त्याचबरोबर फिट होऊन संघात परतलेल्या जसप्रीत बुमरालाही अंतिम अकरात स्थान देण्यात आलेलं नाही.
भारतीय प्लेईंग इलेव्हन: रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, उमेश यादव, युजवेंद्र चहल
उमेश यादवला संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच टी20त उमेश यादवला संधी देऊन रोहित अँड कंपनीनं आश्चर्याचा धक्का दिला आहे. या मालिकेपूर्वी मोहम्मद शमीला कोरोना झाल्यामुळे आयत्या वेळी भारतीय संघात उमेश यादवची एन्ट्री झाली. पण उमेशनं गेल्या तीन वर्षात एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळलेला नाही. त्यामुळे मोहाली टी20त उमेश यादवचं अंतिम अकरात नाव दिसताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. 2012 साली टी20 पदार्पण केलेल्या उमेश यादवनं आतापर्यंत केवळ सात आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 9 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
पंतला विश्रांती, कार्तिक टीममध्ये
रोहित शर्मानं आशिया कपमधल्या पहिल्या सामन्यातही रिषभ पंतला विश्रांती देऊन कार्तिकला संधी दिली होती. यावेळीही रोहितनं अगदी तसंच केलं. त्यामुळे भारताच्या हाताशी आता गोलंदाजीचे सहा पर्याय उपलब्ध आहे. दरम्यान या पहिल्याच टी20त विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sport