चॅम्पियन खेळाडूनं ड्रेसिंग रूममध्ये केले असे कृत्य की सोडावं लागेल क्रिकेट

बाद झाल्यानंतर या स्टार खेळाडूनं केलेल्या कृत्यामुळं करिअर धोक्यात

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2019 02:27 PM IST

चॅम्पियन खेळाडूनं ड्रेसिंग रूममध्ये केले असे कृत्य की सोडावं लागेल क्रिकेट

सिडनी, 15 ऑक्टोबर : क्रिकेट हा खेळ जेंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. मात्र हल्ली खेळाडूंना खेळाचे गांभीर्य उरले नाही आहे. त्यामुळं क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर लाजीरवाणे प्रकार घडत असतात. असाच एक प्रकार ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या हातून घडला. त्यामुळं ऑस्ट्रेलियन बोर्डानं बेशिस्त खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि दिग्गज फलंदाज अॅण्ड्र्यु सायमंड्स याला क्रिकेट नियमांचे पालन न केल्यामुळं संघातून बाहेर काढले होते. यात आता आणखी एक स्टार खेळाडूचे नाव या यादीत जोडले जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच एका खेळाडूंन ड्रेसिंग रूममध्ये केलेल्य गैरवर्तणुकीमुळं त्याला क्रिकेटही सोडावे लागू शकते.

2015मध्ये वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियानं जिंकलेल्या वर्ल्ड कप संघात महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या मिशेल मार्शवर मोठी कारवाई केली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या स्थानिक स्पर्धेत मिशेलचा ताबा सुटला आणि त्यानं रागात ड्रेसिंग रूममध्ये गैरवर्तणुक केले. मार्शला गेल्या काही काळापासून राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नव्हते, मात्र इंग्लंड विरोधात झालेल्या पाचव्या अॅशेस सामन्यात त्याला संघात घेण्यात आले. मात्र आता स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या असमर्थनीय कृत्यामुळं क्रिकेटला रामराम करावे लागेल.

वाचा-'जगातले सर्व कर्णधार मठ्ठ, विराट तेवढा शहाणा'; शोएबच्या VIDEOने खळबळ

रविवारी शेफील्ड शील्ड सामन्यात मार्श खराब प्रकारे बाद झाल्यानंतर मैदानावर आणि मैदानाबाहेर आपला राग व्यक्त केला. मार्शनं ड्रेसिंग रूममध्ये जाऊन भिंतीवर जोरात पंच मारला, त्यामुळं त्याच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. दुखापत गंभीर असल्यामुळं मार्शला सामना मध्येच सोडावा लागला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेला मार्श तस्मानिया विरोधात चौथ्या दिवशी पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. त्यामुळं त्यानं राग व्यक्त करत ड्रेसिंग रूमच्या भिंतीवर फटका मारला. दरम्यान पुढच्या आठवड्यात फिटनेस टेस्ट झाल्यानंतर मार्श पुन्हा सामना खेळणार की नाही, हे ठरवण्यात येणार आहे.

Loading...

वाचा-IPLच्या लिलावाआधी झाला अश्विनचा फैसला! 'या' संघात मिळाली जागा

दरम्यान वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे कोच अॅडम वोग्स यांनी मार्शलच्या वागणुकीवर टीका केली आहे. वोग्स यांनी मार्शचे वागणे निराशाजनक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, त्यानं इतर खेळाडूंसमोर चुकीचे उदाहरण ठेवले आहे, असेही सांगितले. हा सामना स्थानिक क्रिकेटमध्ये येत असल्यामुळं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळं मार्शवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदी घालण्यात आलेली नाही.

वाचा-ICCने क्रिकेटमधील सर्वात वादग्रस्त नियमात केला बदल; आता होणार नाही अन्याय!

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2019 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...