मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेटपटूंनी लाखो रुपयांची ऑफर धुडकावली, 'ही' लीग खेळणार नाहीत

क्रिकेटपटूंनी लाखो रुपयांची ऑफर धुडकावली, 'ही' लीग खेळणार नाहीत

क्रिकेटला जुलै महिन्यात एक नवा फॉरमॅट मिळणार आहे. इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) 21 जुलैपासून द हंड्रेड (The Hundred) या स्पर्धेचं आयोजन करणार आहे, पण ही स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच आयोजकांना धक्का बसला आहे.

  • Published by:  Shreyas

लंडन, 3 जुलै : क्रिकेटला जुलै महिन्यात एक नवा फॉरमॅट मिळणार आहे. इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) 21 जुलैपासून द हंड्रेड (The Hundred) या स्पर्धेचं आयोजन करणार आहे, पण ही स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच आयोजकांना धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कमीत कमी 10 महिला क्रिकेटपटूंनी कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा खेळायला नकार दिला आहे. आयोजकांनी खेळाडूंना भरघोस पगाराशिवाय अतिरिक्त रक्कम देण्याचीही ऑफर केली होती, यानंतरही महिला क्रिकेटपटूंनी आपला निर्णय बदलला नाही.

द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार महिला खेळाडूंना जास्तीत जास्त 16 लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंना 10 लाख रुपयांच्या अतिरिक्त भत्त्याचीही ऑफर देण्यात आळी. ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या टीममध्ये असलेल्या 11 खेळाडूंपैकी 10 खेळाडूंनी त्यांचं नाव मागे घेतलं आहे. मेग लेनिंग, एलिसा हिली आणि बेथ मूनी या त्या खेळाडू आहेत. एलिस पेरी हिने अतिरिक्त 10 लाख स्वीकारून लीग खेळण्याचा निर्णय घेतला का नाही, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

महिला-पुरुष खेळाडूंच्या पगारात फरक

द हंड्रेड लीगमध्ये महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंच्या पगारात बराच फरक आहे. पुरुष खेळाडूंना जास्तीत जास्त 1 कोटी रुपये मिळणार आहेत, तर महिलांची 16 लाख रुपयांवर बोळवण केली जाणार आहे. पुरुषांना कमीत कमी 25 लाख आणि महिलांना 4 लाख रुपये मिळणार आहेत. 21 जुलै ते 21 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. महिला आणि पुरुष कॅटेगरीमध्ये प्रत्येकी 8-8 टीम सहभागी होणार आहेत. प्रत्येक टीममध्ये 15-15 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्ड कोरोना काळात होणाऱ्या या स्पर्धेत होणारी अडचण आणि क्वारंटाईनच्या नियमांमुळे परदेशी खेळाडूंना अतिरिक्त पैसे देणार आहे. खेळाडूंना त्यांच्याच देशात 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू स्पर्धेतून हटल्यानंतर त्यांच्याऐवजी स्थानिक खेळाडूंना संधी दिली जाणार आहे.

10 बॉलची ओव्हर

द हंड्रेड या स्पर्धेत 6 बॉलच्या ओव्हरऐवजी 10 बॉलची ओव्हर खेळवली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक बॉलर ओव्हरला 10 बॉल टाकेल. एका सामन्यात एक बॉलर जास्तीत जास्त 20 बॉल टाकू शकतो. 25 बॉलचा पावरप्ले प्रत्येक इनिंगमध्ये असेल, म्हणजेच फक्त एक फिल्डर 30 यार्डाच्या बाहेर असेल. एक मॅच 150 मिनीटांमध्ये संपेल, तसंच दोन इनिंगमध्ये अडीच मिनिटांचा ब्रेक असेल.

First published:

Tags: Cricket