Home /News /sport /

दुष्काळात तेरावा महिना, IPL मुळे पुन्हा बसणार पाकिस्तानला धक्का!

दुष्काळात तेरावा महिना, IPL मुळे पुन्हा बसणार पाकिस्तानला धक्का!

आयपीएल 2022 ला (IPL 2022) मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरूवात होणार असून मे महिन्याच्या शेवटी स्पर्धा संपणार आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमात 10 टीम सहभागी होणार आहेत.

    मुंबई, 25 जानेवारी : आयपीएल 2022 ला (IPL 2022) मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरूवात होणार असून मे महिन्याच्या शेवटी स्पर्धा संपणार आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमात 10 टीम सहभागी होणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम पहिल्यांदाच मैदानात उतरतील. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदाची आयपीएल भारतात प्रेक्षकांशिवाय होणार आहे. आयपीएलच्या वेळापत्रकांची अजून घोषणा झालेली नसली तरी याचा फटका पाकिस्तानला बसणार आहे. आयपीएल आणि ऑस्ट्रेलियन टीमचा पाकिस्तान दौरा (Pakistan vs Australia) एकाच वेळी असणार आहे. या दौऱ्यात 3 टेस्ट, 3 वनडे आणि एका टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. पण ऑस्ट्रेलियन खेळाडू पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून आयपीएल खेळण्यासाठी जाऊ शकतात, असं ऑस्ट्रेलियन टीमच्या निवड समितीचा प्रमुख जॉर्ज बेली म्हणाला आहे. 'सगळे फॉरमॅट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी ताळमेळ बसवणं कठीण आहे, खासकरून फास्ट बॉलर्सना शारिरिक ताणावरही लक्ष द्यावं लागतं. आयपीएल खेळाडूंसाठी सुवर्णसंधी आहे. खेळाडूंना पैसे तर मिळतातच पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत त्यांना खेळण्याची संधीही मिळते,' असं बेली इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला. PAK vs AUS : पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने ठेवली मोठी अट, PCB चा मात्र नकार पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तीन टेस्ट मॅचची सीरिज 3 ते 25 मार्चदरम्यान कराची, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये होणार आहे. तर मर्यादित ओव्हरची सीरिज 29 मार्च ते 5 एप्रिलदरम्यान लाहोरमध्ये होईल. आयपीएलमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू पाकिस्तानमध्ये टेस्ट सीरिज खेळून वनडे आणि टी-20 सीरिजमधून माघर घेऊ शकतात.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Australia, Ipl 2022, Pakistan

    पुढील बातम्या