भावाला आऊट करण्याच्या प्रयत्नात क्रिकेटपटू झाला रक्तबंबाळ, पाहा VIDEO

भावाला आऊट करण्याच्या प्रयत्नात क्रिकेटपटू झाला रक्तबंबाळ, पाहा VIDEO

दोन वेगवेगळ्या संघात खेळणारे भाऊ एकमेकांसमोर आले. भावाने मारलेला चेंडू झेलण्याच्या प्रयत्नात पाय घसरून पडल्याने क्रिकेटपटू जखमी झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अॅश्टन एगर हा सामन्यावेळी त्याच्या भावाने मारलेल्या फटक्यामुळे जखमी झाला. मार्श एकदिवसी कपमध्ये पश्चिम ऑस्ट्रेलियाकडून खेळताना दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या त्याच्याच भावाने मारलेला चेंडू झेलण्याच्या नादात त्याला जबरदस्त जखम झाली. यामुळे रक्तस्राव झाल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. हा सामना अॅश्टनच्या संघाने म्हणजेच पश्चिम ऑस्ट्रेलियानं 6 धावांनी जिंकला.

सामन्यावेळी अॅश्टन मिड ऑनला उभा होता. तेव्हा त्याचा भाऊ वेस एगरने मारलेला चेंडू झेलण्याचा अॅश्टनने प्रयत्न केला. चेंडू जवळ येण्याआधी अॅश्टनचा पाय घसरला आणि त्यावेळीच डोळ्यांजवळ लागला. त्यामुळे चेहऱ्यावर जखम झाली आणि त्यातून रक्त आले. त्यानंतर मैदानावर येऊन डॉक्टरांनी तपासणी केली.

अॅश्टन जखमी होताच लहान भाऊ वेस धावत त्याच्याजवळ पोहचला. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला न खेळण्याचा सल्ला दिला. मैदानावरून बाहेर जाताना अॅश्टन हसत गेला पण नंतर त्याला पुन्हा खेळण्यासाठी उतरता आले नाही.

ऑस्ट्रेलिकडून 9 एकदिवसीय आणि 4 कसोटी सामन्यात अॅश्टन खेळला आहे. मात्र त्याचा भाऊ वेसला अजुनही राष्ट्रीय संघात संधी मिळालेली नाही. दरम्यान, या सामन्यात अॅश्टनने 5 धावा केल्या आणि 9 षटकांत 48 धावा देत 1 गडी बाद केला. तर वेसने 5 गडी बाद केले. त्यात अॅश्टनचासुद्धा समावेश होता.

अॅश्टन ऑस्ट्रेलियाकडून लंका आणि पाकिस्तान यांच्याविरुद्धच्या मालिकेत खेळला होता. यात त्याने 7 गडी बाद केले होते. पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये तो खेळण्याची

शक्यता आहे.

रोहितची जागा घेणार मयंक अग्रवाल, 'या' खेळाडूची करणार सुट्टी!

Published by: Suraj Yadav
First published: November 18, 2019, 10:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या