21 व्या वर्षी जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन, दिग्गजांना मागे टाकून रचला इतिहास

21 व्या वर्षी जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन, दिग्गजांना मागे टाकून रचला इतिहास

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत यंदा महिला एकेरीमध्ये नवी विजेती मिळाली आहे. अमेरिकेच्या सोफिया केनिन हिने स्पेनच्या गरबाइन मुगुर्झा हिला पराभूत करून विजेतेपद पटकावलं.

  • Share this:

मेलनर्ब, 01 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत यंदा महिला एकेरीमध्ये नवी विजेती मिळाली आहे. अमेरिकेच्या सोफिया केनिन हिने स्पेनच्या गरबाइन मुगुर्झा हिला पराभूत करून विजेतेपद पटकावलं. दोघीही पहिल्यांदाच या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचल्या होत्या. अत्यंत कडव्या लढतीमध्ये सोफियाने बाजी मारली.

सोफियाने मुगुर्झाला 4-6, 6-2, 6-2 ने पराभूत केलं. या विजयासह मारिया शारापोव्हानंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी ती सर्वात तरुण टेनिसपटू ठरली. शारापोव्हाने वयाच्या 20 व्या वर्षी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते. सध्या सोफिया 21 वर्षांची आहे.

सोफिया आणि मुगुर्झा यांच्यात कडवी लढत झाली. पहिल्या सेटमध्ये 4-4 अशी बरोबरी साधल्यानंतर मुगुर्झाने आघाडी घेतली आणि सेट जिंकला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये सोफियाने मुगुर्झाला संधीच दिली नाही. एकवेळ सोफियाने 4-1 अशी आघाडी घेतली होती. त्यानंत मुगुर्झाने पुढचा गेम जिंकला पण सोफियाने सलग दोन सेट जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्येही सोफियाने मुगुर्झाला पुनरागमनाची संधी दिली नाही.

अमेरिकेची असलेल्या सोफिया केनिनने अॅश्ले बार्टीला तिच्या घरच्या मैदानावर पराभूत करून फायनलला धडक मारली होती. तर मुगुर्झाने सिमोना हालेपला पराभूत केलं होतं. सोफियाचे ऑस्ट्रेलियन ओपनचे स्वप्न पूर्ण झाले तर मुगुर्झाला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

दुखापतीमुळं संपणार भारतीय खेळाडूचे करिअर? न्युझीलंड दौऱ्यातून घेतली माघार

First published: February 1, 2020, 5:15 PM IST

ताज्या बातम्या