मेलबर्न, 27 जानेवारी : सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने राफेल नदालचा 6-0,6-2, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. जोकोव्हिचचे ऑस्ट्रेलियन ओपनचे हे सातवे विजेतेपद ठरले आहे. तर नदालचे या स्पर्धेचे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले. तर सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धेच दोन वेळा विजेतेपद मिळवण्याचे नदालला आणखी वाट पहावी लागणार आहे.
.@DjokerNole reunited with Norman once again.#AusOpen #AusOpenFinal pic.twitter.com/J6HBOr367d
— #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2019
ऑस्ट्रेलियन ओपनच्या 107व्या अंतिम फेरीत जोकोव्हिचने नदालचा सहज पराभव केला. आधुनिक टेनिसच्या इतिहासात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम जोकोव्हिचने स्वत:च्या नावावर केला. त्याने ही स्पर्धा 7 वेळा जिंकली आहे. तर रॉजर फेडररने ही स्पर्धा 6 वेळा जिंकली आहे.
जोकोव्हिचने सर्व प्रथम 2008मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवले होते. 2011, 2012 आणि 2013 सलग 3 वेळा त्याने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्याने 2015 आणि 2016मध्ये या स्पर्धेचे पुन्हा जेतेपद मिळवले होते. सर्वाधिक 20 ग्रॅड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररच्या विक्रमाला मागे टाकण्यासाठी जोकोव्हिचला आता आणखी पाच जेतेपदांची गरज आहे. आजच्या विजेतेपदासह जोकोव्हिचने पीट सॅम्प्रास यांच्या 14 ग्रॅड स्लॅम विजेतेपदाचा विक्रम मागे टाकला. सर्वाधिक ग्रॅड स्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या यादीत जोकोव्हिच तिसऱया स्थानावर आहे. तर 17 जेतेपदासह नदाल दुसऱ्या स्थानावर आहे.
जोकोव्हिच आणि नदाल यांच्यातील अंतिम सामना 2 तास 4 मिनिटे चालला. याआधी या दोघांच्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या 2012मधील अंतिम सामना 5 तास 53 मिनिटे चालला होता. ग्रॅड स्लॅम स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात दिर्घकाळ चाललेला सामना होता.
जोकोव्हिच आणि नदाल यांच्यात आतापर्यंत 16 सामने झाले आहेत. त्यापैकी 13 वेळा जोकोव्हिचने विजय मिळवला आहे.
VIDEO : रेल्वेखाली सापडलेल्या महिलेला एकदा वाचवलं, पण ती परत...!