ऑस्ट्रेलियन ओपनची नवी राणी कोण?; सिमोना हालेप आणि कॅरोलिन वोझ्नियाकीमध्ये रंगणार सामना

ऑस्ट्रेलियन ओपनची नवी राणी कोण?; सिमोना हालेप आणि कॅरोलिन वोझ्नियाकीमध्ये रंगणार सामना

ऑस्ट्रेलियन ओपनला यंदा नवी राणी मिळणार आहे. या स्पर्धेच्या महिला एकेरीत सिमोना हालेप आणि कॅरोलिन पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे.

  • Share this:

27 जानेवारी : ऑस्ट्रेलियन ओपनला यंदा नवी राणी मिळणार आहे. या स्पर्धेच्या महिला एकेरीत सिमोना हालेप आणि कॅरोलिन पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. सिमोना हालेप आणि कॅरोलिनमधला हा अंतिम सामना आज दुपारी खेळवण्यात येणार आहे. सिमोना हालेप आणि कॅरोलिन या जागतिक क्रमवारीतल्या नंबर वन आणि नंबर टू टेनिसपटूंमध्येच रंगणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीची अंतिम लढाई असणार आहे. जिंकणारी वीरांगना ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदाची मानकरी ठरेलच, पण जागतिक क्रमवारीतला नंबर वनही तिचाच होईल.

2017 सालच्या फ्रेन्च ओपनपासून टेनिसविश्वाला प्रत्येक ग्रँडस्लॅमनं एक नवी विजेती दिली आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या रणांगणातही तीच परंपरा सुरु राहणार आहे. त्यामुळं आता ऑस्ट्रेलियन ओपनची नवी राणी कोण होते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. सिमोना हालेप आणि कॅरोलिन वोझ्नियाकी या दोघीनांही आजवरच्या कारकीर्दीत ग्रँड स्लॅम मानाचं एकही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. त्यामुळं दोघीही ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतील.

सिमोना हालेप

- ग्रँड स्लॅम फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ

- 2014 आणि 2017 साली फ्रेन्च ओपनची अंतिम फेरी -

- दोन्हीवेळा उपविजेतेपदावर समाधान

- फ्रेन्च ओपनच्या दोन उपविजेतेपदांसह डब्ल्यूटीएची 6 विजेतीपदं

- जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर

कॅरोलिन वोझ्नियाकी

- तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅमच्या फायनलचं तिकीट - 2009 आणि 2014 साली अमेरिकन ओपनची फायनल गाठली

- वोझ्नियाकीच्या पदरी दोन्हीवेळा निराशाच

- अमेरिकन ओपनच्या दोन उपविजेतेपदांसह डब्ल्यूटीएची तब्बल 27 विजेतीपदं

 

First published: January 27, 2018, 10:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading