नवी दिल्ली, 28 डिसेंबर: ऑस्ट्रेलियाने मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या अॅशेस कसोटी क्रिकेट मालिका (Ashes Series) आपल्या नावावर केली आहे. कंगारुंच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे 32 वर्षीय वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड (Scott Boland)ने. त्याने पदार्पणातच ऐतिहासिक कामगिरी करत क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य केले.
ऑस्ट्रेलियाकडून 32 वर्षीय टेस्ट डेब्यू करणाऱ्या स्कॉट बोलँडने पहिल्या मुकाबल्यात इतिहास रचला. मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या अॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेत त्याने दुसऱ्या डावात केवळ 7 रन देत 6 विकेट घेतल्या. बोलँडने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडला दुसऱ्या डावात 68 धावांवर गुंडाळले.
ऑस्ट्रेलियाने जिंकली Ashes, 6 धावात 7 विकेट; स्कॉटने पाहुण्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
स्कॉट बोलँडने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात अवघ्या 21 चेंडूत सहा विकेट्स घेतल्या. त्याने अवघ्या 19 चेंडूत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यापूर्वी ऑस्ट्रेलियन गोलंदाज एर्नी तोशाकने 1947 मध्ये भारताविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत केवळ 19 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या होत्या. तोशकच्या विक्रमाची बरोबरी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेंट्राबिज कसोटीत केली होती. ब्रॉडनेही अवघ्या 19 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या. बोलंडने सर्वात कमी चेंडूत 6 बळी घेत इतिहास रचला.
स्कॉट बोलँड हा ऑस्ट्रेलियाचा 463 वा कसोटी क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी खेळणारा बोलँड हा चौथा आदिवासी क्रिकेटपटू आहे. हा गोलंदाज वेस्टर्न व्हिक्टोरिया राज्यातील गुलिदजान जमातीचा आहे.
स्कॉट बोलँडने 2016 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो ऑस्ट्रेलियासाठी 14 एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 16 आणि टी-20मध्ये तीन विकेट्स आहेत.
स्कॉट बोलँड पूर्वी, एक पुरुष आणि दोन महिला आदिवासी क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियासाठी कसोटी खेळले आहेत. फेथ थॉमस ही महिला आदिवासी क्रिकेटपटू आहे जिने पहिल्यांदा हे स्थान मिळवले.
वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी हा कसोटी खेळणारा पहिला आदिवासी पुरुष क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातील महत्त्वाची सदस्य असलेली अष्टपैलू ऍशले गार्डनर ही दुसरी महिला आदिवासी क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियातील मूळ रग्बी खूप खेळतात.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्कॉट बोलँडच्या नावावर जबरदस्त विक्रम आहे. त्याने 80 सामन्यात 279 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याने होम ग्राउंड मेलबर्नमध्येच 100 विकेट्स घेतल्या आहेत. 58 लिस्ट ए सामन्यात 69 विकेट्स आणि 61 टी-20 सामन्यात 74 बळी घेतले आहेत. रेड बॉलवर तो अधिक यशस्वी झाला असला तरी. पदार्पणाच्या कसोटीतच सात विकेट घेत त्याने हेही सिद्धही केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.