Home /News /sport /

RCB च्या खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक, मानसिक तणावामुळे निर्णय

RCB च्या खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक, मानसिक तणावामुळे निर्णय

याआधी ग्लेन मॅक्सवेल, विल पुकोवस्की आणि निक मॅडिन्सन यांनीदेखील मानसिक तणावामुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती.

    मुंबई, 17 मे : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून (RCB) खेळणाऱ्या ऑलराऊंडरने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा डॅनियल सॅम्स (Daniel Sams) याने मानसिक तणावाचं कारण देत क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घ्यायचं ठरवलं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपली निवड करण्यात येऊ नये, असं सॅम्सने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितलं होतं, यानंतर त्याची निवड करण्यात आली नाही. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बायो-बबलमध्ये राहिल्यामुळे सॅम्स मानसिक तणावात गेल्याचं सांगितलं जात आहे, याच कारणामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. आयपीएल सुरू व्हायच्याआधी डॅनियल सॅम्सला कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे तो भारतातच क्वारंटाईन झाला होता. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर सॅम्स आरसीबीच्या टीममध्ये दाखल झाला. ऑस्ट्रेलियात पुन्हा बॉल टॅम्परिंगचं भूत, या खेळाडूच्या चौकशीला सुर ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार सॅम्सने मानसिक तणावामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जायचा निर्णय घेतला. याआधी ग्लेन मॅक्सवेल, विल पुकोवस्की आणि निक मॅडिन्सन यांनीदेखील मानसिक तणावामुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. ऑस्ट्रेलियाची टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर (Australia vs West Indies) जाणार आहे, या दौऱ्यात 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. 9 जुलै, 10 जुलै, 12 जुलै, 14 जुलै आणि 16 जुलैला टी-20 मॅच होतील, तर 20 जुलै, 22 जुलै आणि 24 जुलैला वनडे मॅच होतील. श्रीलंका क्रिकेटमध्ये बंड! भारत दौऱ्यापूर्वी खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी ऑस्ट्रेलियाची टीम एरॉन फिंच (कर्णधार), एलेक्स कॅरी, स्टीव स्मिथ, एश्टन एगर, जेसन बेहरडॉर्फ, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेजलवूड, मोइसेस हेनरिक्स, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रिले मेरिडिथ, जॉश फिलीपी, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, तनवीर संघा, डार्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, स्वेपसन, एंड्रयू टाय, मॅथ्यू वेड, एडम झम्पा
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021, RCB

    पुढील बातम्या