'मला वाटलं तो फोटो काढण्यासाठी आलाय पण त्याने...'

सामना जिंकल्यानंतर जल्लोष करण्यात मग्न असलेल्या महिला क्रिकेटपटूला त्यानं मैदानावरच KISS करून प्रपोज केलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2019 10:38 AM IST

'मला वाटलं तो फोटो काढण्यासाठी आलाय पण त्याने...'

मेलबर्न, 20 ऑक्टोबर : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा चाहते आवडत्या खेळाडूंना भेटत असतात. खेळाडूंवरचं प्रेम जाहीर करताना पोस्टरद्वारे दाखवत असतात. मात्र कधी कधी काही असे प्रसंग घडतात ज्याची चर्चा रंगते. ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला बिग बॅश लीगवेळी सामना संपल्यानंतर एका महिला खेळाडूला तिच्या प्रियकराने लग्नासाठी मागणी घातली.

अॅडलेड स्ट्रायकरची खेळाडू अमांडा वेलिंग्टनला तिच्या बॉयफ्रेंडनं अशा प्रकारे मागणी घातल्यानंतर आश्चर्यांचा धक्का बसला. मेलबर्नविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर त्याचा जल्लोष कऱण्यात मग्न असतानाच अमांडाचा बॉयफ्रेंड मैदानावर आला. त्यानं सर्वांसमोर गुडघ्यावर बसून अमांडाला अंगठी देत प्रपोज केलं. अॅडलेड स्ट्रायकरने त्यांच्या ट्विटरवरून याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अमांडाने याबद्दल बोलताना सांगितलं की, जेव्हा टेलरला मैदानावर पाहिलं तेव्हा वाटलं की त्याला आमच्यासोबत फोटो काढायचा आहे. पण तो प्रपोज करेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती. त्यानं एक आश्चर्याचा धक्काच दिला. मी खूप आनंदी आहे असं अमांडा म्हणाली.

अमांडाने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातून पदार्पण केलं होतं. आतापर्यंत तिने देशासाठी 1 कसोटीत, 8 टी20 आणि 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Loading...

अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE VIDEO

नाणेफेकीत दोन कर्णधारांना हरवल्यावर विराटला आवरलं नाही हसू, पाहा VIDEO

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Oct 20, 2019 10:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...