फॉर्ममध्ये असलेल्या क्रिकेटपटूचं मानसिक संतुलन बिघडलं, 'या' संघाला बसला मोठा धक्का

फॉर्ममध्ये असलेल्या क्रिकेटपटूचं मानसिक संतुलन बिघडलं, 'या' संघाला बसला मोठा धक्का

मानसिक संतुलन बिघडल्यामुळं खतरनाक अष्टपैलू खेळाडूनं घेतला क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय.

  • Share this:

सिडनी, 31 ऑक्टोबर : मानसिक स्वास्थ ही खरतर खुप गंभीर समस्या आहे. सध्या जगभरात 30 टक्के लोकांना विविध मानसिक आजार झाले आहेत. मात्र आता चक्क एका स्टार क्रिकेटपटूचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. त्यामुळं या दिग्गज खेळाडूने क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा सर्वात खतरनाक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)ने क्रिकेटपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका विरोधात होत असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये मॅक्सवेल मैदानात उतरला मात्र आता त्यानं ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं काही काळ आता मॅक्सवेल क्रिकेटपासून दूर राहणार आहे. मानसिक संतुलन ठिक नसल्यामुळं मॅक्सवेलनं हा मोठा निर्णय घेतला आहे.

वाचा-धक्कादायक! BCCIने पैसेच दिले नाहीत, भारतीय संघ अडकला परदेशात

श्रीलंका विरोधात केले होते तुफानी अर्धशतक

श्रीलंका विरोधात पहिल्या टी-20 सामन्यात तुफानी फलंदाजी करत फक्त 22 चेंडूत अर्धशतकी कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात मॅक्सवेलला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. तर, तिसऱ्या टी-20 सामन्यात मॅक्सवेलला विश्रांती देण्यात आली. मॅक्सवेलच्या जागी तिसऱ्या कसोटी सामन्यात डार्सी शॉर्टला संघा स्थान देण्यात आले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियानं टी-20 मालिकेत 2-0नं विजयी आघाडी घेत मालिका आपल्या खिशात घातली आहे.

वाचा-ही तर टी-20 वर्ल्डकपच्या आधीची झलक आहे; ICCने शेअर केला Video

संघव्यवस्थापनानं दिली मॅक्सवेलच्या मानिसक स्वाथ्याची माहिती

2019मध्ये 31 वर्षीय मॅक्सवेलनं याच कारणामुळं आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत टीमचे फिजिओ मायकल लॉड यांनी याबाबत माहिती दिली आहे. मायकल यांनी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत ही माहिती दिली. “ग्लेन मॅक्सवेलचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळं त्याला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं त्यानं क्रिकेटपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे”, असे सांगितले.

ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं केला मदतीचा दावा

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) ग्लेन मॅक्सवेलच्या ब्रेक घेण्याच्या निर्णयाचे समर्थन करत, त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मॅक्सवेलनं आपल्या फिजीओंची चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. तर, ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं ग्लेनला मदत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे सांगितले.

वाचा-147 किमीच्या वेगाने आलेला चेंडू फलंदाजाने केला गायब; व्हिडिओ होतोय व्हायरल

VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...

First published: October 31, 2019, 1:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading