मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज मॅचमध्ये जोरदार ड्रामा; डीआरएसमुळे मिळाली कॅप्टनची विकेट

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज मॅचमध्ये जोरदार ड्रामा; डीआरएसमुळे मिळाली कॅप्टनची विकेट

ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज टी20

ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज टी20

दोन मॅचच्या टी-20 सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाला 1-0 अशी आघाडी मिळाली आहे. ही सीरिज आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 ऑक्टोबर: या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपपूर्वी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी-20 सीरिज खेळवली जात आहे. या सीरिजमधील पहिली मॅच कॅनबेरा येथे झाली. या मॅचमध्ये अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजचा तीन विकेट्स राखून पराभव केला. मॅचदरम्यान वेस्ट इंडिजच्या डावातील 11व्या ओव्हरमध्ये ग्राउंडवर जोरदार ड्रामा झाला. शेवटच्या क्षणी घेतलेल्या डीआरएसमुळे ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनची विकेट मिळाली.

लेफ्ट हँडेड बॅट्समन असलेला निकोलस पूरन क्रीजवर टिकून राहिला असता तर त्याने ऑस्ट्रेलियाच्या हातातून मॅच हिसकावली असती. मात्र, मिचेल स्टार्कनं त्याची विकेट घेऊन ही शक्यता संपवली. वेस्ट इंडिजच्या डावातील 11व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कनं पूरनला जबरदस्त यॉर्कर टाकला. ओव्हरमधील पाचव्या बॉलवर निकोलस पूरन गोंधळून गेला आणि बॉल रोखण्याच्या प्रयत्नांत क्रीझमध्ये खाली पडला. बॉल पूरनच्या पायाला लागला असं सुरुवातीला वाटत होतं. पण, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच आणि इतर ऑस्ट्रेलियन प्लेअर्सना याबद्दल शंका होती.

हेही वाचा - Ind vs SA ODI: लखनौत टीम इंडिया निसटता पराभव, पण गब्बरचा हा 'शेर' ठरला दक्षिण आफ्रिकेवर भारी

डीआरएसमुळे मिळाली पूरनची विकेट

निकोलस पूरन खाली पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन अॅरॉन फिंच काही वेळ आपल्या सहकारी खेळाडूंकडे बघत राहिला. त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया येते का? हे तो बघत होता. नंतर शेवटच्या क्षणी त्याने डीआरएसची मागणी केली. बॉल विकेटला आदळत असल्याचं थर्ड अंपायरला बॉल ट्रॅकिंगमध्ये आढळलं. त्यामुळे निकोलस पूरनला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. पूरन आऊट झाल्याचं पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आनंद झाला.

हेही वाचा - Ind vs SA ODI: लखनौत टीम इंडिया जिंकली असती, पण विजयाच्या आड आले 'हे' प्रमुख अडथळे

एक बॉल राखत ऑस्ट्रेलियानं जिंकली मॅच

दरम्यान, पहिल्या T-20 सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, अगोदर बॅटिंग करून वेस्ट इंडिजनं नऊ विकेट्स गमावून 145 रन्स केल्या होते. वेस्ट इंडिजचा ओपनर कायले मायर्सनं 36 बॉलमध्ये 39 रन्स केल्या तर ओडियन स्मिथ 27 रन करून रनआउट झाला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडनं तीन तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 146 रनच्या टारगेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं एक बॉल बाकी असताना तीन विकेट्स राखून विजय मिळवला.

दोन मॅचच्या टी-20 सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाला 1-0 अशी आघाडी मिळाली आहे. ही सीरिज आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. येत्या 16 ऑक्टोबरपासून आयसीसी टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

First published:

Tags: Cricket news, Sports, T20 world cup 2022