मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

‘रात्री स्वप्नात यायचा बुमराह आणि...’, दिग्गज फलंदाजाचा धक्कादायक खुलासा

‘रात्री स्वप्नात यायचा बुमराह आणि...’, दिग्गज फलंदाजाचा धक्कादायक खुलासा

आजही बुमराहच्या यॉर्करचा सामना करणे भल्याभल्या फलंदाजांना जमले नाही आहे. अशाच एका दिग्गज फलंदाजाने बुमराहबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

आजही बुमराहच्या यॉर्करचा सामना करणे भल्याभल्या फलंदाजांना जमले नाही आहे. अशाच एका दिग्गज फलंदाजाने बुमराहबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

आजही बुमराहच्या यॉर्करचा सामना करणे भल्याभल्या फलंदाजांना जमले नाही आहे. अशाच एका दिग्गज फलंदाजाने बुमराहबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

    नवी दिल्ली, 16 मार्च : जगातला सर्वात यशस्वी गोलंदाज आणि यॉर्कर किंग अशी ओळख असलेल्या बुमराहची दहशत सर्व खेळाडूंमध्ये आहे. आजही बुमराहच्या यॉर्करचा सामना करणे भल्याभल्या फलंदाजांना जमले नाही आहे. अशाच एका दिग्गज फलंदाजाने बुमराहबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने (Aaron Finch) बुमराहची भीती वाटायची असे नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले. फिंचने, 2018मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला असताना त्याला वाईट स्वप्न पडायची असे सांगितले. ही स्वप्न होती भारताचे जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांची. स्वप्नात भुवनेश्वर आणि बुमराह मस्तीसाठी त्याची विकेट घेताना फिंचला दिसायचे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटवरील अॅीमेझॉनवर प्रसिद्ध झालेल्या ‘द टेस्ट’ या माहितीपटात फिंचने, भुवनेश्वर मला बाद करत असल्याचे मला घाम फुटत असे सांगितले. वाचा-VIDEO : ‘कब्र बनेगी तेरी’, जेव्हा ख्रिस गेल फिल्मी बोलतो तेव्हा काय होतं पाहा या मालिकेत फिंचला भारतीय गोलंदाजांनी त्रास दिला होता आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या इनस्विंग बॉल खेळताना त्रास झाला. या मालिकेत भुवनेश्वरने चार वेळा फिंचची विकेट घेतली. तीन वेळा वनडेमध्ये आणि एकदा टी-20मध्ये एकदा भुवीने फिंचला बाद केले. त्यामुळं भुवी आणि बुमराह यांच्या भीतीने फिंच रात्री झोपेतून उठायचा, असे त्याने या मुलाखतीत सांगितले. यावेळी फिंचने, “मला नेहमी वाटायचे की उद्या मी पुन्हा बुमराहला सामोरे जात आहे आणि तो मला बाद करतोय” असा खुलासा केला. वाचा-ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने भारतीय तरुणीसोबत दुसऱ्यांदा केला साखरपुडा भारताने रचला होता इतिहास या दौर्याचत भारताने इतिहास रचला होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताने 2-1 ने जिंकली. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात पराभूत करण्याची कामगिरी याआध कोणत्याच आशियाई देशाने केली नव्हती. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने पहिली कसोटी 31 धावांनी जिंकली. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना 146 धावांच्या फरकाने जिंकला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. टीम इंडियाने तिसरा सामना 137 धावांच्या फरकाने जिंकला आणि मालिकेत पुन्हा 2-1ने आघाडी घेतली. मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारताने मोठी धावसंख्या उभारून यजमानांना फॉलोऑन दिला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला बरोबरीत समाधान मानावे लागले. कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिका 2-1ने जिंकली. तर टी -20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. वेगवान गोलंदाज बुमराहने चार सामन्यांच्या मालिकेत 21 बळी घेतले. वाचा-कोरोनाच्या भीतीने धोनीने सोडली चेन्नई सुपर किंग्जची साथ, CSKने शेअर केला VIDEO
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या