Home /News /sport /

पैशांच्या तंगीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बनला कारपेंटर, जिंकवून दिलाय वर्ल्ड कप

पैशांच्या तंगीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बनला कारपेंटर, जिंकवून दिलाय वर्ल्ड कप

संन्यास घेतल्यानंतर क्रिकेटपटूंना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत असल्याची अनेक उदाहरणं आपण बघितली आहेत. ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी स्पिनर झेवियर डोहर्टीही (Xavier Doherty) 2017 साली क्रिकेटपासून लांब झाल्यानंतर कठीण परिस्थितीतून जात आहे. डोहर्टी सध्या घर चालवण्यासाठी सुतार काम करत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 मे : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक खेळाडूंचं आयुष्य सोपं राहत नाही. संन्यास घेतल्यानंतर क्रिकेटपटूंना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत असल्याची अनेक उदाहरणं आपण बघितली आहेत. ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी स्पिनर झेवियर डोहर्टीही (Xavier Doherty) 2017 साली क्रिकेटपासून लांब झाल्यानंतर कठीण परिस्थितीतून जात आहे. डोहर्टी सध्या घर चालवण्यासाठी सुतार काम करत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (Australian Cricketers Association) डोहर्टीचा सुतार काम शिकतानाचा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये डोहर्टी एका बिल्डिंगच्या साईटवर अवजारांसोबत कारपेंटरच्या वेशात दिसत आहे. झेवियर डोहर्टी एक काळ ऑस्ट्रेलियाच्या टीमचा प्रमुख स्पिनर होता. 2010 साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2015) ऑस्ट्रेलियाच्या विजयी टीमचा डोहर्टी भाग होता. याच वर्ल्ड कपमध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, पण फायनलमध्ये त्याला खेळायची संधी मिळाली नाही. 2017 साली डोहर्टीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनने शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये डोहर्टी म्हणाला, 'क्रिकेट सोडलं तेव्हा काय करायचं, याबाबत काहीच ठरवलं नव्हतं. सुरुवातीचे 12 महिने जे काम मिळालं, ते मी केलं. यामध्ये लॅण्डस्केपिंग, ऑफिसचं काम आणि क्रिकेटसंबंधीच्या काही कामांचा समावेश होता.' यानंतर डोहर्टीने कारपेंटर बनण्यासाठीचा कोर्स करायला सुरुवात केली. यापैकी त्याचं 75 टक्के प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. 'जेव्हा क्रिकेट खेळून होतं, तेव्हा लक्षात येतं, आता पैसे कुठून येणार. पुढे काय करायचं, आयुष्य कसं असेल? या गोष्टी डोक्यात येतात. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या ट्रांझिशन मॅनेजर कार्ला यांनी फोन करून मदत केली, सोबतच शिक्षणासाठी पैसेही दिले, यामुळे आर्थिक मदत झाली, तसंच खर्चही कमी झाला,' अशी प्रतिक्रिया डोहर्टीने दिली. झेवियर डोहार्टीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 4 टेस्ट, 60 वनडे आणि 11 टी-20 मॅच खेळल्या. त्याला टेस्टमध्ये 7, वनडेमध्ये 55 आणि टी-20 मध्ये 10 विकेट मिळाल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Australia, Cricket

    पुढील बातम्या