फलंदाजाचा जीवघेणा शॉट; थोडक्यात वाचला गोलंदाज, पाहा खतरनाक VIDEO

ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये पुन्हा एका धक्कादायक प्रसंग घडला. यात गोलंदाजाचा थोडक्यात बचावला.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 05:41 PM IST

फलंदाजाचा जीवघेणा शॉट; थोडक्यात वाचला गोलंदाज, पाहा खतरनाक VIDEO

सिडनी, 22 सप्टेंबर : क्रिकेटच्या मैदानात असे अनेक प्रसंग घडले आहेत, ज्यावेळी खेळाडूंचा जीव धोक्यात आला आहे. हे असे प्रसंग खेळाडूंना हादरून सोडतात. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युजच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलिया सहित क्रिकेट जगतात भितीदायक वातावरण झाले होते. त्यामुळं ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं काही कडक नियमांची अंमलबजावणी केली. दरम्यान नुकत्याच अशेस मालिकेत स्टिव्ह स्मिथच्या डोक्यावर जोफ्रा आर्चरचा बाऊंसर लागला होता. या प्रसंगानंतर क्रिकेट जगतात धडकी भरली होती.

दरम्यान रविवारी आणखी एक ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूसोबत असा प्रकार घडला. हा प्रसंग एवढा भितीदायक होता की गोलंदाजाचा जीव थोडक्यात वाचला. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यात रविवारी न्यु साऊथ वेल्स (New South Wales) आणि क्विसलॅंड (Queensland) यांच्यात सामना खेळला गेला. यात न्यु साऊथ वेल्सची जलद गोलंदाज मिक्की एडवर्ड्स (Mickey Edwards) आपल्याच चेंडूवर थोडक्यात वाचली. दरम्यान, क्विसलॅंड संघाची फलंदाज सॅम्युअल हीजलेटनं मिक्कीच्या चेंडूवर असा शॉट लगावला की सर्वांना धडकी भरली. सॅम्युअलनं लगावलेल शॉट मिक्कीच्या डोक्यावर लागणार होता, मात्र शेवटच्या सेकंदात खाली वाकल्यामुळं मिक्कीच्या हाताला चेंडू लागला.

वाचा-धोनीच्या निर्णयामुळं चाहत्यांना बसला शॉक, म्हणाला...

मिक्कीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. cricket.com.au ने आपल्या अधिकृत ट्विटवरून हा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला. यात मिक्कीला गंभीर जखम झाली नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

वाचा-क्रिकेटच्या इतिहासातील फक्त दुसराच सामना, रवी शास्त्रींनी कसोटी केली टाय!

दरम्यान क्विनलॅंड्सनं न्यु साऊथ वेल्स संघावर सोपा विजय मिळवला. पहिले फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 305-5 धावा केल्या. तर, क्विनलॅंड्सनं 12 चेंडूआधी हे लक्ष्य पार केले. क्विनसलॅंड संघाकडून हीजलॅटनं सर्वाधिक 70 धावा केल्या. तर मार्नस लाबुशेननं 67 धावा केल्या.

वाचा-INDvsSA 3rd T20 : शेवटच्या सामन्यावर आस्मानी संकट? जाणून घ्या हवामानाची स्थिती

'शरद पवारांचा कलम 370 हटवण्यास विरोध', अमित शाह म्हणतात...पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...